हिंगोली : एक मोठी बातमी समोर येते आहे. 27 मे रोजी कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर MLA Santosh Bangar यांच्या घराबाहेर फायरिंग Firing झाली आहे. याबाबत ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक आयोध्या पोळ यांनी ट्विट केले आहे. पण धक्कादायक म्हणजे स्वतः आमदार संतोष बांगर यांनी असं काही घडलंच नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक आयोध्या पोळ यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं की, 27 मे रोजी बांगर यांच्या घराबाहेर फायरिंग झाले आहे. बांगर यांच्या घरासमोरच एका व्यक्तीने शिवीगाळ केली आणि फायरिंग देखील केली. असं पवळ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिल आहे.
या बाबत मात्र आमदार संतोष बांगर यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. असं काहीही झालेलं नाही काहीही संबंध नाही अशी प्रतिक्रिया बांगर यांनी दिली आहे.
एकंदरीतच या प्रकरणांमध्ये मोठ्या घटनेबाबत थेट सोशल मीडियावर सवाल करण्यात आला आहे. परंतु बांगर पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सत्य नेमकं काय ? हे समोर येणार का ? हे येणारा काळच सांगेल.