मुंबई : आज मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ED ने धाड टाकली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी आज सकाळी आठ वाजल्यापासून ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब या घरासह इतर चार ठिकाणी ईडीने धाड टाकली आहे. त्याचबरोबर वायकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी देखील केली जाते आहे.
नेमकं काय आहे प्रकरण ?
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वायकर यांच्यावर जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी मोठे आरोप केले आहेत. 2021 मध्ये तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना जोगेश्वरीतील या मैदानावर पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी सप्टेंबर महिन्यामध्ये रवींद्र वायकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तर आज थेट पुढील त्यांच्या राहत्या घरावर आणि इतर चार ठिकाणी कारवाई केली आहे.