• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, July 26, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचा वापर करून निराधार महिलांना आधार गृहात दाखल करावे – डॉ. नीलम गोऱ्हे

Web Team by Web Team
October 7, 2023
in महाराष्ट्र
0
पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचा वापर करून निराधार महिलांना आधार गृहात दाखल करावे – डॉ. नीलम गोऱ्हे
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोणावळा : लोणावळ्यात अल्पवयीन मुलींवर तसेच रस्त्यावर भटकणाऱ्या मुलीवर अत्याचार घडल्याचे प्रकार समोर आले आहेत. रस्त्यांवर सीसीटीव्ही आहेत त्याद्वारे पोलिसांनी अशा मुलींवर लक्ष ठेवणे आवश्यक असताना तसे झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवावे आणि स्वतःहून रस्त्यावर भटकणाऱ्या मुलींना आधार गृहात दाखल करावे अथवा त्यांना त्यांच्या घरी, गावी पाठवण्याची व्यवस्था करावी असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आज लोणावळा येथील शासकीय विश्रामगृहात श्री. सत्यसाई कार्तिक सहायक पोलीस अधीक्षक, श्री. किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक लोणावळा ग्रामीण, श्री. सीताराम डुबल पोलिस निरीक्षक लोणावळा शहर यांच्यासोबत बैठक घेत लोणावळ्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने लवकरच विधानभवनात रेल्वे पोलीस आणि लोणावळा पोलिसांची बैठक घेणार आहोत. यामध्ये ज्या महिला रेल्वे, बसने प्रवास करत आहेत त्या महिलांना सुरक्षेच्यादृष्टीने एक माहिती पत्रक देण्यात यावे. ज्याद्वारे त्यांना काही अडचण आली तर ते तात्काळ पोलिसांशी संपर्क करू शकतात. तसेच लोकलमधील महिलांच्या डब्यात, रेल्वे स्थानकावर जास्तीच्या महिला पोलिसांची नेमणूक करण्यात यावी. याशिवाय त्यांनी रेल्वे स्थानकावरील भटक्या, बेघर महिलांना आधार गृहात, बाल गृहात पाठविण्याची व्यवस्था करावी. असे सांगितले. तसेच याबाबत विधानभवनात बैठक घेऊन आढावा घेणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

लोणावळ्यामधील अत्याचाराच्या प्रकरणातील अजून पाच आरोपी सापडलेले नाहीत. त्यांना लवकरात लवकर शोधण्यासाठी पोलिसांनी दोन पथकं तैनात केली असल्याचे सांगितले आहे. ज्या दोन मुलांनी अत्याचारित मुलींची सुटका केली त्या मुलांना देखील पोलिसांच्यावतीने प्रोत्साहनपर मदत करण्यात येणार आहे. ज्या अत्याचारित मुली शाळेत शिक्षण घेत आहेत त्यांना उपसभापती, स्त्री आधार केंद्राची अध्यक्ष आणि शिवसेना नेता यानात्याने शालेय उपयोगी मदत करण्यात येणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी भरोसा सेलच्या माध्यमातून दर महिन्याला अत्याचारित मुलींशी संपर्क करून त्यांचा आत्मविश्वास वाढवावा, त्यांची विचारपुस करून त्यांना काही मदत लागत असल्यास आमच्याद्वारे, स्वयंसेवी संस्थांद्वारे अथवा सरकारच्या माध्यमातून मदत करावी. जेणेकरून त्या मुलींच्यात त्या एकटे असल्याची भावना निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

नवरात्रीच्या आधी एकविरा देवी मंदिर आणि परिसरात योग्य ती दक्षता घ्यावी…

एकविरा देवी देवस्थान आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने मंदिर परिसरात भाविकांसाठी योग्य पावले उचलली गेली आहेत. असे असले तरी नवरात्रात यंत्रणा कोलमडल्यासारखी दिसते त्याकरिता प्रशासनाने नवरात्राआधीच योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

ग्रामीण भागात ‘महिला शिवदूत’ नेमणार…
काल वर्षा बंगल्यावर खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ‘महिला शिवदूत’ नेमण्याचे ठरले. या महिला शिवदूतांच्या मार्फत स्त्री शक्ती योजना राबविली जाणार आहे. यामध्ये शासनाच्या २२ प्रकारच्या योजना महिलांसाठी राबविण्यात येणार असून स्त्री सशक्तीकरण करण्यात येणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

Previous Post

गुजरातमध्ये बनवण्यात येणाऱ्या ‘या’ कफ सिरपच्या उत्पादनावर बंदी

Next Post

MAHARASHTRA POLITICS : “देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत”, चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले, पहा VIDEO

Next Post
MAHARASHTRA POLITICS : “देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत”, चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले, पहा VIDEO

MAHARASHTRA POLITICS : "देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत", चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले, पहा VIDEO

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Governor Ramesh Bais : ‘वृद्ध मित्र’ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक उपक्रम व्हावा

Governor Ramesh Bais : ‘वृद्ध मित्र’ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक उपक्रम व्हावा

3 years ago
kargil vijay divas

कारगिल विजय दिवस, कहाणी भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथेची

3 years ago
Old pension schemes : जुन्या पेन्शन योजनेबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार; वित्तमंत्री अजित पवार यांचे विधानपरिषदेत आश्वासन

Old pension schemes : जुन्या पेन्शन योजनेबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार; वित्तमंत्री अजित पवार यांचे विधानपरिषदेत आश्वासन

3 years ago
Bageshwar baba- Shivranjani

Shivranjani Tiwari : बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्याशी लग्नाची चर्चा खोटी? शिवरंजनी म्हणाली- ‘माझा लग्नाचा संकल्प…’

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.