नवी दिल्ली : निवडणूक आयुक्तांनी यावेळी खास अंदाजात सध्याच्या राजकीय वातावरण आणि घसरलेली टीका टिप्पणी करण्याची भाषा यानुसार शायरी करून पत्रकार परिषदेस सुरुवात केली आहे.
”दुश्मनी जम के करो, लेकीन ये गुंजाईश रहे की,
जब कभी हम दोस्त हो जाए तो हम शरमिंदा ना हो”
https://www.facebook.com/share/v/1Dd9gJuSeno59Y4o/?mibextid=qi2Omg
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची पत्रकार परिषद निवडणूक आयोगाच्या वतीने सुरू आहे. यामध्ये मुख्य आयुक्तांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर संधू, ज्ञानेश कुमार यांची पत्रकार परिषद सुरू आहे.
एकूण 543 लोकसभा जागांसाठी येत्या 19 एप्रिल पासून निवडणुका सुरू होणार असून ही निवडणूक 7 टप्प्यात पार पडणार आहेत. महाराष्ट्रात 26 एप्रिलला मतदान होणार आहे. तसेच 4 जूनला सर्व देशात मतमोजणी होईल.
मुख्य आयुक्तांनी काय केल्या घोषणा
- 10.5 लाख मतदान केंद्रांवर 55 लाख ईव्हीएमवर होणार मतदान
देशात 10.5 लाख मतदान केंद्रे असतील. तर या निवडणुकीसाठी 55 लाख ईव्हीएमचा वापर करण्यात येणार आहे.
- 1.82 कोटी नवे मतदार यावेळी मतदान करणार
देशात एकूण 97 कोटी मतदार आहेत. यामध्ये 49.7 कोटी पुरुष तर 47 कोटी मतदार या महिला आहेत. एकूण मतदारांमध्ये 1.82 कोटी मतदार पहिल्यांदाच त्यांच्या मतदानाचा अधिकार वापरणार आहेत.
- मतदान केंद्रावर पिण्याचं पाणी, शौचालय आणि व्हीलचेअरची सुविधा
- स्टार कँपेनर्सना नियमावली देण्याचे पक्षांना आदेश
- साड्या, कुकर वाटणाऱ्यांवर ठेवले जाणार लक्ष
- मनी पॉवरचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार
- दिव्यांग मतदारांना घरबसल्या मतदान करता येणार
- बुथवर पिण्याचे पाणी, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, रॅम्प, व्हीलचेअर आदी सुविधा उपलब्ध असतील.