बारामती : बारामतीतून काही दिवसांपूर्वी विजय शिवतारे नावाचं वादळ शांत झालं आणि त्यानंतर आता महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कटू शब्दात टीका करणारे विजय शिवतारे यांनी आता करून अजित पवार यांचे गोडवे गायला सुरुवात केली आहे.
Lok Sabha Elections 2024 : जागा वाटपात भाजपचा दबाव ? राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट अजित पवारांवर नाराज, नेमक्या मागण्या काय? वाचा सविस्तर
बारामतीमध्ये सध्या महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजय शिवतारे प्रचार करत आहेत. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना देखील काही सूचना केल्या. ते म्हणाले की, ” आपले बूथ सांभाळा, विजय आपलाच आहे ! बारामतीची जागा तीन लाख मतांच्या फरकाने जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना विंचू म्हटले होते. आता थेट त्यांनी कौतुक करून अजित पवार यांना कार्यसम्राट नेतृत्व असे म्हटले आहे. बारामतीची जागा मी लढवणाराच, घराणेशाही मोडून काढणार असा त्यांनी पणं केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्ती केल्यानंतर शिवतारेंनी तलवार म्यान केली आणि आता युतीधर्म पळून सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला जोमाने सुरुवात केली आहे.