• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, July 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home देश-विदेश

Titanic Submarine : टायटॅनिकचे अवशेष पहायला जाताना मृत्यू झालेले ५ जण कोण होते?

Web Team by Web Team
June 23, 2023
in देश-विदेश, Trending
0
Titanic Submarine

Titanic Submarine

7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Titanic Submarine Latest News : १९९७ ला आलेला ‘टायटॅनिक’ चित्रपटातील मोठ्या आकाराचं टायटॅनिक जहाज अनेकांना माहिती असेल. हे जहाज १९१२ ला समुद्रात बुडालं होतं. या अपघातात १५०० प्रवाशांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. या बुडालेल्या जहाजाच्या अवशेषाला पाहण्यासाठी ‘टायटन’ नावाच्या एका पाणबुडीत काही लोक गेले होते. मात्र रविवारी (१८ जून) टायटनचा प्रवास सुरु झाल्यानंतर केवळ १ तासातच या पाणबुडीचा संपर्क तुटला आणि ती बेपत्ता झाली होती. मात्र या पाणबुडीचा स्फोट होऊन तिच्यामधील पाचही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येत आहे. (Titanic Submarine debris found)

टायटॅनिक जहाजाचे अवशेष असलेल्या परिसरातच या पाणबुडीचे अवशेष आढळून आल्याची माहिती US कोस्ट गार्डने दिली आहे. ही पाणबुडी बेपत्ता झाल्यापासूनच या घटनेची मोठी चर्चा सुरु होती. या पाणबुडीमध्ये असलेल्या प्रवाशांमध्ये पाकिस्तानी वंशाच्या अब्जाधीशाचा देखील समावेश होता.

Related posts

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024
Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

June 7, 2024

टायटन पाणबुडीचा आकार

ओशियनगेट कंपनीची ही पाणबुडी २२ फूट लांबी आणि ९.२ फूट रुंदीची व १०,४३२ किलो वजनाची होती. आकाराने व्हॅनसारखी ही पाणबुडी होती. एकावेळी ५ जण या पाणबुडीत बसु शकत होते. तसेच आपत्कालिन स्थितीमध्ये ४ दिवस पुरेल इतका ऑक्सिजन या पाणबुडीमध्ये असायचा. या पाणबुडीमध्ये एक छोटे टॉयलेट आणि एक लहानशी खिडकी होती.

टायटॅनिक टूरसाठी किती खर्च यायचा? (Titanic submarine tour cost)

ओशियनगेट नावाच्या एका कंपनीची ही पाणबुडी होती. या कंपनीकडूनच टायटॅनिक टूरचे आयोजन करण्यात येत होते. २०२१ पासून बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठीची टायटॅनिक टूर सुरु करण्यात आली होती. या टूरमध्ये तब्बल ८ तास पाण्याखाली जवळपास ५९५ किमीचा प्रवास करण्यात यायचा. यासाठी अडीच लाख डॉलरचे (२ कोटी रुपये) तिकीट देखील ठेवण्यात आले होते.

स्टॉकटन रश ही ६१ वर्षीय व्यक्ती या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर होती. रश यांनीच २००९ मध्ये ओशियनगेट कंपनीची स्थापना केली होती. ते स्वतः टायटन पाणबुडीच्या प्रत्येक टूरमध्ये प्रवाशांसोबत जायचे. १८ जून रोजीच्या दुर्दैवी घटनेत ४ प्रवाशांसोबतच त्यांचा देखील मृत्यू झाला आहे.

बेपत्ता पाणबुडीसाठी शोधकार्य कसं सुरु होतं? (Titanic Submarine search operation)

अटलांटिक महासागरात ज्या ठिकाणी टायटॅनिक जहाज बुडालं होतं तो भाग अतिशय धोकादायक समजला जातो. या ठिकाणी सूर्यप्रकाश देखील पोचत नसल्याने तिथे गडद अंधार असतो. या परिसराला ‘मिडनाईट झोन’ असं म्हणतात.

या शोध मोहिमेत अमेरिका, कॅनडा यांच्या नौदलासहित काही व्यावसायिक कंपन्यांनी देखील सहभाग घेतला होता. अनेक खासगी जहाजं देखील टायटन पाणबुडीचा शोध घेत होती. पाण्याच्या आतमध्ये जीपीएस किंवा इतर यंत्रणा काम करत नसल्याने सोनार सारख्या यंत्रणेचा आधार घेत शोधमोहिम सुरु होती. काही तज्ज्ञांच्या अंदाजानूसार या पाणबुडीमध्ये केवळ चार दिवस पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा होता. त्यामुळे लवकरात लवकर पाणबुडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात होता. या शोधपथकांना समुद्रात तब्बल ४ किमी खोलीपर्यंत शोधमोहिम राबवावी लागणार होती.

अमेरिकन नौदलाच्या CURV-21 या मानवरहित आणि रिमोटवर चालणाऱ्या वाहनाच्या मदतीने देखील टायटन पाणबुडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. (What robot found the Titanic)

टायटन पाणबुडीतील प्रवासी कोण होते? (Titanic Submarine passengers)

या पाणबुडीमधील पाचही जण त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती होते.

स्टॉकटन रश

ओशियनगेट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले स्टॉकटन रश हे देखील या पाणबुडीत होते. रश यांचं वय ६१ वर्षे होतं. ते एक अनुभवी इंजिनिअर होते. पाणबुडी बनवण्याचा अनुभव देखील त्यांना होता.

शहजादा दाऊद आणि सुलेमान दाऊद

पाकिस्तानी वंशाचे अब्जाधिश असलेले उद्योजक शहजादा दाऊद हे देखील या पाणबुडीत होते. त्यांचं वय ४८ वर्षे होतं. त्यांचा १९ वर्षांचा मुलगा सुलेमान दाऊद हा देखील त्यांच्या सोबत होता. कुटंबासोबत ते ब्रिटनमध्येच राहायचे. ब्रिटनच्या प्रिन्स ट्रस्ट चॅरिटी बोर्डाचे ते सदस्य देखील होते.

शहजादा हे अॅग्रो कॉर्पोरेशन कंपनीचे व्हॉइस चेअरमन म्हणुन काम पाहायचे. त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला होता. त्यानंतर ते ब्रिटनमध्ये स्थायिक झाले होते.

हॅमिश हार्डिंग

हॅमिश हार्डिंग युकेमधील मोठे उद्योजक होते. त्यांचं वय ५८ वर्षे होतं. अक्शन एविएशन नावाच्या एका कंपनीचे ते मालक होते. हॅमिश यांना वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी द्यायला आवडायचं. पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाला त्यांनी अनेकदा भेट दिली होती.

हॅमिश यांच्या नावे एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील आहे. पाण्याखाली सर्वाधिक वेळ डाईव्ह करण्याचा विक्रम त्यांच्या नावे नोंदवला गेला होता. गेल्या वर्षीच हॅमिश यांना पाणबुडीच्या सफरीवर जायचं होतं मात्र पाणबुडीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने त्यावेळी त्यांना जाणं रद्द करावं लागलं होतं.

पॉल हेन्री नार्जिओलेट

७७ वर्षे वय असलेले पॉल हेन्री नार्जिओलेट हे देखील टायटन पाणबुडीमध्ये होते. फ्रेंच नेव्हीमध्ये डायव्हर म्हणुन त्यांनी काम केलेले होते.

जगातील इतर एक्स्प्लोरर पेक्षा सर्वात जास्त वेळा त्यांनी बुडालेल्या टायटॅनिक जहाजाच्या अवशेषाची पाहणी केली होती, असे म्हटले जाते. त्यामुळेच त्यांना टायटॅनिक अशा टोपण नावाने देखील ओळखायचे. १९८७ मध्ये पहिल्यांदा टायटॅनिक जहाजाच्या अवशेषाची पाहणी केली गेल्या त्या मोहिमेत देखील पॉल याचा सहभाग होता.

टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांवर संशोधन करणाऱ्या कंपनीचे संचालक म्हणुन देखील ते काम पाहायचे.

हे देखील वाचा :

Plane Crash in Colombia : कोलंबिया विमान अपघातात 40 दिवस बेपत्ता असलेली मुलं सापडली जिवंत

Previous Post

Darshana Pawar Murder Case : लग्न करण्यास नकार दिल्यामुळे केला मर्डर, आरोपीला अटक

Next Post

Opposition’s Meet in Patna : पाटण्यातील विरोधी पक्षांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Next Post
opposition meeting in patna

Opposition's Meet in Patna : पाटण्यातील विरोधी पक्षांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Lok Sabha Elections 2024 : आज पासून लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानास सुरुवात; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब केले मतदान

Lok Sabha Elections 2024 : आज पासून लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानास सुरुवात; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब केले मतदान

1 year ago
Lok Sabha Elections : महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच सुप्रिया सुळेंच्या व्हाटसअप स्टेट्सनंतर आता बारामतीत उमेदवारीचे झळकले बॅनर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Lok Sabha Elections : महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच सुप्रिया सुळेंच्या व्हाटसअप स्टेट्सनंतर आता बारामतीत उमेदवारीचे झळकले बॅनर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

1 year ago
एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का ? संजय राऊतांची कडवट टीका

एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का ? संजय राऊतांची कडवट टीका

2 years ago
Twitter become X

Twitter become X : Elon Musk ने बदललं ट्विटरचं नाव, मस्कची Twitter वरून कमाई करण्याची धडपड

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.