Uttarkashi Tunnel Rescue: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेस्क्यू टीम बोगद्याच्या वरून रैट होल माइनिंग आणि बोगद्याच्या वरून ड्रिलिंग करत आहेत. लवकरच कामगारांना बाहेर काढले जाईल, अशी आशा आहे. बचाव पथकाने कामगारांच्या नातेवाईकांना कपडे आणि बॅग तयार ठेवण्यास सांगितले आहे. कामगारांना बोगद्याच्या बाहेर काढल्यानंतर पहिल्यांदा त्यांना रुग्णालयात नेण्यात येईल. (Uttarkashi Tunnel Rescue Drilling work to rescue 41 workers trapped in Uttarkashi tunnel resumes)
उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात अडकलेले 41 मजूर बाहेर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अखेर सतराव्या दिवशी हे कामगार सुखरूप बाहेर येतील. उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या बचावकार्याची माहिती देताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, कामगारांना बाहेर काढण्यासाठी बोगद्यात पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.
उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या सिलक्यारा येथील यमुनोत्री महामार्गावर निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन झाल्यामुळे 12 नोव्हेंबरपासून अडकलेल्या 41 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी 16 दिवसांपासून मदतकार्य सुरू आहे. मात्र, कामगारांना बाहेर काढण्याचा क्षण जवळ आल्याचे संकेत मिळू लागले आहेत. पुढच्या काही तासातच कामगारांना सुखरूप बाहेर काढलं जाऊ शकतं.
या बचाव मोहिमेच्या 16 व्या दिवशी बोगद्याच्या आतील ऑगर मशीनसह काम थांबवण्यात आलं असून, मजुरांकडून मॅन्युअल खोदकाम सुरू करण्यात आलं आहे. मॅन्युअल मोहीम 24 तास सुरू राहण्याची अपेक्षा आहे. या मोहिमेत 24 मजुरांचा सहभाग आहे.
आणखी वाचा – Railway Job: तुम्हाला ही रेल्वेत TTE बनायचे का ? पात्रता काय, पगार किती मिळतो ? सर्वकाही जाणून घ्या
सिलक्यारा बोगदा बांधणारी संस्था, नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएचआयडीसीएल) चे व्यवस्थापकीय संचालक महमूद अहमद यांनी सांगितलं की, “सिलक्याराच्या बाजूचे ढिगारे भेदून पोलादी पाईप्सच्या सहाय्याने एक्झिट बोगदा बांधण्याचं काम सुरू होतं, त्यातील अडथळे दूर करुन आता मॅन्युअल ड्रिलिंगचं काम सुरू झालं आहे.” याबाबत माहिती देताना ते म्हणाले, “आतापर्यंत ऑगर मशीनने ड्रिलिंग केलं जात होतं, आता मॅन्युअल ड्रिलिंगद्वारेच बचाव कार्य पूर्ण केलं जाईल.”