नवी दिल्ली : सध्या फेसबुक Facebook , इंस्टाग्राम Instagram हा असा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असा आहे की तो अगदी पाच मिनिटांसाठी जरी बंद झाला तरी युजर्समध्ये चलबिचल सुरू होते. काल अशा युजर्सचे वाईट स्वप्न नेमकं खरं झालं आणि अचानक फेसबुक आणि इंस्टाग्राम बंद झालं. मंगळवारी रात्री अचानक फेसबुक आणि instagram लॉग आऊट झालं आणि पुन्हा पासवर्ड देखील मागत होतं. पण पासवर्ड टाकल्यानंतर तो रॉंग पासवर्ड असल्याचं येत होतं. बरोबर पासवर्ड टाकून देखील फेसबुक आणि इंस्टाग्राम लॉग इन होईना म्हणून युजर्समध्ये प्रचंड चलबिचल सुरू झाली.

नेमकं काय झालं होतं
Facebook आणि instagram अचानक बंद झाल्याबाबत मेटाचे प्रवक्ता अँडी स्टोन यांनी माहिती दिली. केवळ तांत्रिक समस्येमुळे काल मंगळवारी रात्री फेसबुक आणि इंस्टाग्राम बंद पडले होते. मंगळवारी ही समस्या दूर झाली आहे. सर्विसेस डाऊन झाल्याबद्दल प्रवक्ता अँडी स्टोन यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली.
दरम्यान आजकाल फेसबुक आणि इंस्टाग्राम बद्दल अनेकांना एडिशन देखील झाल आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर रील बनवणारे आणि रील पाहणारे यांच्यामध्ये मंगळवारी रात्री प्रचंड धाकधुखीच वातावरण होतं. हे इतर सोशल मीडिया साईटवरच्या कमेंटमध्ये आणि कंटेंट मध्ये दिसून येत होतं. अनेकांना अशीही भीती वाटली की त्यांचं फेसबुक आणि instagram हॅक झाली आहे की काय ? त्यानंतर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या युजर्सनी फेसबुक आणि इंस्टाग्राम बंद पडल्या बाबत कन्टेन्ट लिहायला सुरुवात केली. तर अनेक जण मीन्स देखील पोस्ट करत होते. पण सध्या Facebook आणि instagram पुन्हा व्यवस्थित सुरू आहेत.