Threads Vs Twitter : मेटाने नवीन मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म लाँच केल्यानंतर एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीच 10 कोटी (Threads App Gains 100 Million Users in Under Week) वापरकर्त्यांनी थ्रेड्स अॅप (Threads App) इन्स्टॉल केले. ट्विटरचे वकील अॅलेक्स स्पिरो यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना धमकी दिलीये. ट्विटरच्या वकिलांचे म्हणणे आहे की, मेटाने जुन्या ट्विटर कर्मचाऱ्यांना कामावर घेतले आहे, ज्यांना ट्विटरने काढून टाकले आहे. ट्विटरची संवेदनशील माहिती ट्विटरच्या माजी कर्मचाऱ्यांनी वापरली आहे.
मस्कने मार्क झुकेरबर्गबद्दल केली अपमानजनक टिप्पणी
थ्रेड्स अॅप हे Instagram खात्याशी जोडलेले आहे. कंपनी आता वापरकर्त्यांना Google Play Store द्वारे Android वर थ्रेड्स अॅपच्या बीटा आवृत्तीची चाचणी घेण्यासाठी साइन अप करण्याची परवानगी देत आहे आणि नवीन वैशिष्ट्ये लोकांसाठी रिलीज होण्यापूर्वी वापरून पहायला सांगत आहे. जर तुम्ही तुमचे Instagram Account डिलिट केले तर तर तुमचे Threads App सुद्धा डिलिट होईल. इंस्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी म्हणाले की, वापरकर्त्यांना त्यांचे Threads App स्वतंत्रपणे डिलिट करता येईल, यावर कंपनी काम करत आहे. थ्रेड्स प्रचंड वेगाने नवीन वापरकर्ते मिळवत आहे त्यामुळे एलॉन मस्क अस्वस्थ दिसत आहे. Threads App आल्यानंतर ट्विटर वापरकर्ते कमी झाल्याचं बोललं जातयं. ट्विटरशी स्पर्धा करत थ्रेड्स अॅप लाँच करण्यात आलं, त्यानंतरच हा वाद झालायं. मस्कने रविवारी मेटा सीईओ मार्क झुकेरबर्गबद्दल अपमानजनक टिप्पणी देखील केली, ज्यामुळे थ्रेड्सच्या झटपट वाढीमुळे ट्विटरवर काही गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळाल.
मेटाने जुन्या ट्विटर कर्मचाऱ्यांना कामावर घेतले
ट्विटरचे वकील अॅलेक्स स्पिरो यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना धमकी दिलीये. अॅलेक्सने एका पत्रात म्हटले आहे की, मेटा प्लॅटफॉर्मवर ट्विटरच्या वतीने खटला दाखल केला जाईल. आता कशाच्या आधारे गुन्हा दाखल होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर ट्विटरच्या वकिलांचे म्हणणे आहे की, मेटाने जुन्या ट्विटर कर्मचाऱ्यांना कामावर घेतले आहे, ज्यांना ट्विटरने काढून टाकले आहे. ट्विटरची संवेदनशील माहिती ट्विटरच्या माजी कर्मचाऱ्यांनी वापरली आहे. तसेच ट्विटरच्या मार्केटिंग आणि इतर गोपनीय माहितीचा गैरवापर करण्यात आलांय, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
येत्या काही दिवसांत ट्विटर वापरकर्ते कमी होतील
थ्रेड्सने एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत 100 दशलक्ष वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडलायं, तरीही प्लॅटफॉर्मवर किती वापरकर्ते सक्रिय राहतात हे पाहणे बाकी. दरम्यान, क्लाउडफ्लेअरचे सीईओ मॅथ्यू प्रिन्स यांनी थ्रेड्सवर (द व्हर्जद्वारे) शेअर केलेल्या डेटानुसार, ट्विटरच्या DNS रँकिंगमध्ये वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत घसरण झालीये(Threads Vs Twitter). दरम्यान, ट्विटर सध्या क्लाउडफ्लेअर रडार टॉप 200 डोमेन यादीत 184 व्या क्रमांकावर आहे. थ्रेड्स लाँच झाल्यापासून खूप पसंत केले जात आहे. या अॅपची लोकप्रियता अशीच सुरू राहिली तर येत्या काही दिवसांत ट्विटर वापरकर्ते कमी होतील, असे मानले जात आहे.