ऑलिम्पिकमध्ये टी-20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये टी-20 ची सामना रंगणार आहे. 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये T20 क्रिकेटचा समावेश करण्याची शिफारस IOC ने मान्य केली असून तब्बल 128 वर्षांनी क्रिकेट पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये येणार आहे.
IOC अधिवेशनात टी-20 क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे. 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यान मुंबईत पार पडलेल्या IOC अधिवेशनात यासाठी मतदान झालं असून आता क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला आहे.
अमेरिकेत 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर सोमवारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून यावर मतदान करण्यात आलं असून आता ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटही सामील झालं आहे.
2028 लॉस एंजेलिस येथील ऑलिम्पिकमध्ये आहे. 1900 मध्ये क्रिकेट ऑलिम्पिकचा एक भाग होता. ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणारे क्रिकेट टी-20 फॉरमॅटमध्ये असेल. याशिवाय स्क्वॅशला 2028 च्या ऑलिम्पिक खेळाचा भाग बनवण्यात येणार आहे.क्रिकेट आणि स्क्वॉशसह एकूण 5 खेळांचा समावेश असेल.