PM Modi Deepfake video Viral : सध्या सोशल मीडियावर (Social media) आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) गैरवापर करुन काही लोक व्हिडिओ व्हायरल करतात. प्रगत तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर या काळात मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि येणाऱ्या काळात आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Rashmika mandana) डिपफेक व्हिडिओ (Deepfake Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यावेळेस अनेक बड्या नेत्यांनी तिची पाठराखण करत तिला सहकार्य केलं. पण आता हे व्हिडिओ बनवून व्हायरल करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढलंय. आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डिपफेक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे पंतप्रधानांनी याबाबच चिंता व्यक्त केली आहे. (PM Modi Deepfake video Viral garba ai video photo rashmika mandhana sara tendulkar)
त्या व्हिडिओवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
व्हिडिओ पाहिल्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मी एक व्हिडीओ पाहिला ज्यामध्ये मी गरब्याचं गाणं गाताना दाखवलं आहे. असे अनेक व्हिडीओ ऑनलाइन उपलब्ध आहेत”, असं नरेंद्र मोदी म्हणाले. पक्षाच्या मुख्यालयात पार पडलेल्या ‘दिवाळी मिलन’ कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी पत्रकारांना लोकांना याबाबत सुशिक्षित करण्याचं आवाहन केलं.

“आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या या काळात आपण फार जबाबदारीने तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांत रश्मिका, कतरिना आणि काजोल यांचे डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यानंतर सोशल मीडियावर संताप आणि चिंता व्यक्त केली जात असतानाच नरेंद्र मोदींनी हे विधान केलं आहे.
आणखी वाचा – ST Bus Revenue: दिवाळीत ST महामंडळ मालामाल, अवघ्या १५ दिवसांत ३२८ कोटींचा महसूल
निवेदनात काय म्हटलंय?
या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या परिणामांवर चिंता देखील निर्माण केली जात आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गेल्या आठवड्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सल्ला देणारं निवेदन जारी केलं आहे. ज्यामध्ये असे डीपफेक व्हिडीओ तयार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई तसंच दंड आकारला जाण्याचा उल्लेख केला होता.
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितलं आहे की, चुकीची माहिती पसरवण्यापासून रोखणे हे ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी कायदेशीर बंधन आहे. रिपोर्ट केल्यानंतर 36 तासांच्या आत अशा प्रकारची कोणतीही सामग्री काढून टाका आणि आयटी नियमांनुसार निर्धारित वेळेत त्वरित कारवाई सुनिश्चित करा. तसंच ती सामग्री काढून टाका.

डिजिटल स्पेसमध्ये भारतीयांसाठी सुरक्षितता आणि विश्वास सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचंही ते म्हणाले आहेत. तसंच डीपफेक तयार केल्यास आणि तो शेअऱ करणं यासाठी 1 लाख दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास अशी शिक्षा असल्याचं केंद्राने सांगितलं आहे.