लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी केंद्र सरकारने ‘एक देश, एक निवडणूक’ हा मुद्दा उपस्थित केला असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पावलेही उचलली आहेत. यासाठी सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन केली आहे. आता या समितीच्या पहिल्या बैठकीबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे.
माजी राष्ट्रपती आणि समितीचे अध्यक्ष रामनाथ कोविंद यांनी सांगितले की, ‘वन नेशन, वन इलेक्शन’ समितीची पहिली बैठक २३ सप्टेंबर रोजी होणार आहे.