• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, February 10, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home देश-विदेश

Odisha train accident : मृतदेहाच्या ढिगाऱ्यात वडिलांना जिवंत सापडला मुलगा

Web Team by Web Team
June 6, 2023
in देश-विदेश
0
odisha train accident

odisha train accident

22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शुक्रवारी २ जून रोजी ओडिशा मधील बालासोर येथे झालेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. (Odisha train accident) कोरोमंडल एक्स्प्रेसच्या या अपघातात अनेकांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावलं आहे, तर कित्येक जण जखमी आहेत. मात्र यावेळी एक मोठी घटना समोर आली आहे. मृतदेहाच्या ढिगातून एका जिवंत व्यक्तीला त्याच्या वडिलांनी शोधून काढले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात बिस्वजीत मलिक हा २४ वर्षीय तरुण देखील होता. बिस्वजीतचे वडील हेलाराम मलिक यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी २३० किमी रुग्णवाहिकेने प्रवास करत बालासोर गाठलं. अपघातानंतर मुलाला फोन लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र फोन न लागल्याने ते बालासोरला पोचले. अपघातातील जखमींना ठेवण्यात आलेल्या सर्व दवाखान्यांमध्ये त्यांनी मुलाचा शोध घेतला मात्र त्यांना मुलगा दिसला नाही. त्यावेळी हेलाराम यांना काही लोकांनी जवळच असलेल्या एका हायस्कूलमध्ये मृतदेह ठेवले असून तिथे जाऊन पाहायला सांगितले.

Related posts

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

May 29, 2024
#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

May 29, 2024

हेलाराम मलिक त्याठिकाणी गेले असता सुरुवातीला त्यांना आत जाऊ दिले गेले नाही. मात्र नंतर आत गेले असता त्यांना मृतदेह ठेवण्यात आलेल्या ठिकाणी एका व्यक्तीचा हात हलताना दिसला. ती व्यक्ती मुलगा बिस्वजीत असल्याचे त्यांनी ओळखले आणि तातडीने बचाव पथकाकडे धाव घेतली. त्यानंतर लगेचच त्यांच्या मुलाला कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या बिस्वजीतवर उपचार सुरु असून त्याची प्रृकृती स्थिर आहे.

रेल्वे अपघातानंतर बिस्वजीत बेशुद्ध पडला होता आणि त्यादरम्यान बचाव पथकाला त्याचा मृत्यू झाल्याचं वाटल्यानं त्यांनी त्याला मृतदेहांसोबत ठेवलं होतं. मात्र वडिलांनी आपल्या मुलाला मृतदेहांच्या ढिगाऱ्यातून जिवंत शोधून काढलं.

Previous Post

मुंबई-पुण्याला जोडणारी Deccan Queen झाली ९३ वर्षांची, गाडीच्या नावावर आहेत अनेक विक्रम

Next Post

Apple Vision Pro : अॅपलने लाँच केलं मिक्स्ड रिअॅलिटी हेडसेट, आतापर्यंतचं सर्वात भन्नाट प्रॉडक्ट

Next Post
apple vision pro headset marathi

Apple Vision Pro : अॅपलने लाँच केलं मिक्स्ड रिअॅलिटी हेडसेट, आतापर्यंतचं सर्वात भन्नाट प्रॉडक्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

दिवाळी सणानिमित्त येरवडा कारागृह बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री; बंद्यांनी हातमागावर बनवलेल्या पैठणी साड्या प्रदर्शनात मुख्य आकर्षण

दिवाळी सणानिमित्त येरवडा कारागृह बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री; बंद्यांनी हातमागावर बनवलेल्या पैठणी साड्या प्रदर्शनात मुख्य आकर्षण

2 years ago
Porsche Car Accident : ” बापाच्या बापालाही अटक केली ! सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही. ” अजित पवारांनी सगळे आरोप फेटाळले

Porsche Car Accident : ” बापाच्या बापालाही अटक केली ! सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही. ” अजित पवारांनी सगळे आरोप फेटाळले

2 years ago
PMLA प्रकरणी ED ची मोठी कारवाई, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात 11 ठिकाणी छापे; 110 कोटींचा घोटाळा प्रकरण

PMLA प्रकरणी ED ची मोठी कारवाई, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात 11 ठिकाणी छापे; 110 कोटींचा घोटाळा प्रकरण

2 years ago
Nashik Bus Accident

Nashik Bus Accident : सप्तश्रृंगी बस अपघातात महिलेचा मृत्यू तर प्रवासी जखमी; दादा भुसेंनी केली जखमींची विचारपूस

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.