एका जागतिक कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की त्यांनी पहिल्या ह्युमनॉइड रोबोटची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे. पोलिश रम कंपनी डिक्टाडोरने या कंपनीचे नेतृत्व करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणाऱ्या ह्युमनॉइड रोबोट ‘मिका’ची नेमणूक केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, पहिली सीईओ महिला रोबोट म्हणून मिका बोर्ड मेंबर आहे. जो डिक्टाडोरच्या वतीने ऑपरेशन करतो. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये डिक्टाडोरने मिका नावाच्या एआयवर चालणाऱ्या रोबोटची प्रायोगिक सीईओ म्हणून नियुक्ती केली होती.
हे वाचलेत का ? ONLINE SIP सुरू करायचा विचार करताय? वाचा सविस्तर माहिती
कंपनीने म्हटले आहे की, पहिली सीईओ महिला रोबोट म्हणून मिका बोर्ड मेंबर आहे जो डिक्टाडोरच्या वतीने ऑपरेशन करतो. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये डिक्टाडोरने मिका नावाच्या एआयवर चालणाऱ्या रोबोटची प्रायोगिक सीईओ म्हणून नियुक्ती केली होती.प्रसिद्ध एआय रोबोट सोफियाची निर्मिती हॅन्सन रोबोटिक्स या कंपनीने केली होती. डिक्टाडोर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बॉट ची नेमणूक करण्यात अग्रेसर नसली तरी एका चिनी गेमिंग फर्मने गेल्या वर्षी आपल्या उपकंपनीचे सीईओ म्हणून “एआय-संचालित व्हर्च्युअल ह्युमनॉइड रोबोट” नियुक्त केले होते.
मीकाने सीईओ एलन मस्क आणि मार्क झुकेरबर्ग यांच्यावरही भाष्य करताना ते या दोघांपेक्षा सरस असल्याचे म्हटले आहे. एलन मस्क आणि मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्यातील एमएमए च्या लढाईबद्दलही त्यांनी चर्चा केल्याचे डिक्टाडोरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीका यांनी सांगितले. एमएमए फायट प्लॅटफॉर्मबाबत ते म्हणाले की, हा उपाय नाही.
हे वाचलेत का ? ‘TATA’चा IPO लवकरच बाजारात येणार !
मीकाला मानद प्रोफेसरही पदवी देण्यात आली आहे. वॉर्सा येथील २०२३/२४ कॉलेजियम ह्युमनम विद्यापीठाच्या उद्घाटनप्रसंगी महिला ह्युमनॉइड रोबोटला हा पुरस्कार देण्यात आला. त्यांनी व्यासपीठावर भाषण करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे गुण अधोरेखित केले.