मालदीव : ” आम्ही लहान असू पण आम्हाला धमकवण्याचा परवाना मिळत नाही. 15 मार्चपर्यंत भारतीय सैन्य मागे हटवा…! ” असा इशारा मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारत सरकारला दिला आहे.
चीनच्या दौऱ्यानंतर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतावर थेट टीकास्त्र सोडले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी भारत सरकारला हटवण्याची मागणी केली असून, आम्ही लहान असलो पण आम्हाला धमकवण्याचा त्यांना परवाना मिळत नाही. असा थेट इशारा देखील दिला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
नुकत्याच पंतप्रधान मोदी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे मालदीव आणि भारताचे संबंध खराब झाले आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या बाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर भारतीय पर्यटकांनी देखील मालदिवाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मालदीवला मोठा फटका बसला आहे. पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवचे नेते आणि अनेक मंत्र्यांनी अपमानास्पद टिप्पणी केल्याने हा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी मालदीव सरकारने 7 जानेवारीला या तीन मंत्र्यांना त्यांच्या पदावरून निलंबितही देखील केले आहे.