गाझा पट्टी सध्या मूलभूत सुविधांसाठी तळमळत आहे. इस्रायलने गाझाच्या नागरिकांना विजेसह पाणी ही नाकारले आहे. दरम्यान, इस्रायलने आश्वासन े देऊनही गाझा पट्टीला पाणीपुरवठा सुरू केलेला नाही, असे हमासने सोमवारी सांगितले. तर इस्रायलच्या एका अधिकाऱ्याने उत्तर दिले की गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील भागाला काही प्रमाणात पाणी दिले जात आहे.
७ ऑक्टोबर रोजी हमासच्या दक्षिणेकडील शहरे आणि गावांमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझाचा पाणीपुरवठा बंद केला होता.
रविवारी इस्रायलने वॉशिंग्टनसोबत झालेल्या करारानुसार काही पुरवठा पुन्हा सुरू करत असल्याचे म्हटले होते. हमासच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते इयाद अल-बोझोम यांनी सोमवारी सांगितले की, पाणी पुरवठा पुन्हा सुरू झालेला नाही. रहिवासी अस्वास्थ्यकर पाणी पित असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.