इस्लामाबाद : पाकिस्तानचे Pakistan माजी पंतप्रधान इम्रान खान Former PM Imran Khan यांनी तोशाखाना प्रकरणात Toshakhana अपात्र ठरविण्या विरोधात केलेले अपील Appeal मागे घेण्याची याचिका इस्लामाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आमेर फारूक यांनी बुधवारी निकाल जाहीर केला, जो १३ सप्टेंबर रोजी राखून ठेवण्यात आला होता.
दैनिक वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, तोशाखाना अल-कादिर ट्रस्ट आणि सिफर प्रकरणात इम्रान खान यांना अटक करण्यात आली असून ते सध्या अदियाला तुरुंगात आहे. तोशाखाना भेटवस्तूंची खोटी माहिती जाणूनबुजून पाकिस्तान निवडणूक आयोगाकडे सादर केल्याप्रकरणी इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आहे.
तोशाखाना प्रकरणी इम्रान खानला 3 वर्षांची शिक्षा
5 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाने तोफखाना गुन्हेगारी प्रकरणात इम्रान खानला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. दोषी पीटीआयच्या प्रमुखाला एक लाख पाकिस्तानी रुपये (पीकेआर) दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने माजी पंतप्रधानांना पाच वर्षांसाठी सार्वजनिक पदावर राहण्यास अपात्र ठरविले.
काय आहे तोशाखाना प्रकरण
इम्रान खान यांनी २१.५६ दशलक्ष पाकिस्तानी रुपये (पीकेआर) भरून राज्याच्या तिजोरीतून भेटवस्तू खरेदी केल्या होत्या, ज्यातून सुमारे ५८ दशलक्ष रुपये मिळाले होते. या भेटवस्तूंमध्ये ग्राफ मनगटी घड्याळ, कफ लिंकची जोडी, महागडे पेन आणि एक असे गिफ्ट देण्यात आले आहे. अंगठी तर इतर तीन भेटवस्तूंमध्ये चार रोलेक्स घड्याळांचा समावेश होता.