पाकिस्तान : पाकिस्तानचे Pakistan माजी पंतप्रधान नवाझ शरीफ Navaz Sharif यांची इस्लामाबाद उच्च न्यायालयाने Islamabad High Court भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. २०१८ मध्ये या दोन्ही प्रकरणात त्याला दोषी ठरवण्यात आले होते. एव्हनफिल्ड मालमत्ता आणि अल-अजीजिया प्रकरणात झालेल्या शिक्षेला शरीफ यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
सरन्यायाधीश आमेर फारूक आणि न्यायमूर्ती मियांगुल हसन औरंगजेब यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निकाल दिला.
हे वाचलेत का ? India’s Ambitious Space Mission : 2024 मध्ये भारतीय अंतराळवीर स्पेस स्टेशनवर पाठवण्याची ISRO ची तयारी
माजी पंतप्रधानांना जुलै २०१८ मध्ये दोषी ठरवण्यात आले होते
लंडनमधील बेहिशेबी मालमत्तेच्या अॅव्हनफिल्ड मालमत्ता भ्रष्टाचार प्रकरणात जुलै २०१८ मध्ये माजी पंतप्रधानांना दोषी ठरवून १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. डिसेंबर २०१८ मध्ये अल-अजीजिया स्टील मिल प्रकरणात त्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. राष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी वॉचडॉग नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) हे गुन्हे दाखल केले आहेत. या दोन्ही शिक्षेविरोधात त्यांनी अपील दाखल केले होते.
शरीफ २०१९ मध्ये लंडनला गेले आणि परत येऊ शकले नाहीत आणि डिसेंबर २०२० मध्ये आयएचसीने त्यांना दोन्ही प्रकरणात फरार घोषित केले. तब्बल चार वर्षांच्या स्वयंनिर्वासनानंतर ते गेल्या महिन्यात परतले आणि त्यांचे अपील पुन्हा सुरू झाले.