काठमांडू : पश्चिम नेपाळमधील जाजरकोट आणि आसपासच्या भागात सोमवारी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.८ इतकी होती. मात्र या भूकंपात अद्यापतरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
शुक्रवारी झालेल्या भूकंपाने हाहाकार माजवला
या आधी शुक्रवारी ५.८ रिश्टर स्केलतीव्रतेच्या भूकंपाने हाहाकार माजवला होता. या भूकंपात 5 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. दरड कोसळल्याने रस्ता बंद झाल्याने मदत व बचाव कार्यातही अडथळा निर्माण झाला होता.
भूकंपाचा केंद्रबिंदू जाजरकोट येथे होता
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी 4 वाजून 31 मिनिटांनी जाजरकोट आणि आसपासच्या भागात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.८ इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू जाजरकोटमधील रामिदांडा येथे होता. काठमांडूमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
४.५ रिश्टर स्केलतीव्रतेचा भूकंप
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजिकल मेजरमेंटच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दुपारी 4.40 वाजता 4.5 रिश्टर स्केलतीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले.
‘आतापर्यंत १४ धक्के बसले आहेत’
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीचे शास्त्रज्ञ संजय कुमार प्रजापती यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, नेपाळमधील भूकंप हा 14 नोव्हेंबरच्या भूकंपानंतरचा धक्का आहे. आतापर्यंत १४ भूकंप झाले असून, हा आतापर्यंतचा सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप होता.