Cyrus Poonawalla : पुण्यातील लस उत्पादक सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla) यांना हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराचा झटका आल्याचे समजताच त्यांनी पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. डॉ. सायरस पूनावाला यांना 17 नोव्हेंबर गुरुवारच्या सकाळी हृदयविकाराचा झटका आला. (cyrus poonawalla suffers cardiac arrest angioplasty Serum Institute of India)
काय म्हणाले डॉक्टर?
रुबी हॉल क्लिनिकचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. परवेझ ग्रांट यांनी सांगितले की, सायरस पूनावाला यांची प्रकृती आता बरी होत आहे. रुग्णालयाचे सल्लागार अली दारूवाला यांनी सांगितले की, सायरस पूनावाला यांना गुरुवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. शुक्रवारी सकाळी त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. डॉ. परवेझ ग्रांट, डॉ. मॅकले आणि डॉ. अभिजीत खर्डेकर यांच्या देखरेखीखाली डॉ. पूनावाला यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली.
आणखी वाचा – Delisle Bridge Inauguration : मुंबईतील उड्डाणपुलाच्या उद्घाटन प्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल

सीरम इन्स्टिट्यूटची कामगिरी
कोरोना काळात सीरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute of India) कोविडची लस (Covid Vaccine) तयार करुन अनेक भारतीयांचे जीव वाचवले. सायरस पूनावाला ८२ वर्षाचे आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कारभार पाहतायत. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) देशातील लसनिर्मिती करणारी सर्वात मोठी कंपनी बनली आहे.

कोरोना काळात माफक दरात सरकारला लस देणं आणि ती सामान्यापर्यंत मोफत दरात पोहचवण्याचं काम सिरम सरकारने केले. त्या काळात कोविड लसीची गरज जाणून घेऊन ती उपलब्ध करण्याचे काम सिरम इन्स्टिट्यूटने केले. पूनावाला यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. सध्या त्यांना आलेल्या हृदयविकाराचा झटक्यामुळे भारतात सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे.