Biparjoy Update : बिपरजॉय वेगाने वाढत आहे आणि त्याचा प्रभाव किनारी भागावर दिसून येत आहे. ‘अत्यंत तीव्र’ चक्रीवादळाचा हवामान खात्याने इशारा दिला आहे.
Biparjoy Cyclone : हवामान खात्याने (IMD) सांगितले आहे की, ‘अत्यंत तीव्र’ चक्रीवादळ बिपरजॉय पुढील 24 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यताआहे. ते उत्तरेकडून ईशान्येकडे सरकेल. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अरबी समुद्राच्या किनार्यावरील वलसाडमधील बीचवर उंच लाटा उसळल्या आहेत. खबरदारी म्हणून बीच १४ जूनपर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाआहे.
वलसाडचे तहसीलदार टीसी पटेल यांनी सांगितले की, “आम्ही मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये, असे सांगितले आहे. गरज भासल्यास लोकांना गावात हलवले जाईल. त्यांच्यासाठी निवारागृहे तयार करण्यात आली आहेत. बीच 14 जूनपर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे.”
बिपरजॉय हे तीव्र चक्रीवादळ कुठे सरकणार?
IMD ने एका निवेदनात म्हटले आहे की, पूर्व-मध्य अरबी समुद्रातून आलेले अत्यंत तीव्र चक्रीवादळ BIPARJOY उत्तर-पूर्वेकडे सरकले. तसेच हे चक्रीवादळ गोव्याच्या सुमारे 740 किमी पश्चिमेस, मुंबईच्या 750 किमी पश्चिम-नैऋत्येस, पोरबंदरच्या पश्चिम-नैऋत्येस 2 वाजता 760 किमी अंतरावर आहे. बिपरजॉय पुढील तीन दिवसांत उत्तर-ईशान्य आणि नंतर उत्तर-वायव्य दिशेने सरकेल. येत्या 24 तासांत ते आणखी भीषण रूप धारण करेल.