मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ही सध्या ब्रिटनमध्ये आहे. ती वाघनखे नक्की परत आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत असून त्यासाठी आवश्यक प्रवास व इतर खर्च मान्यता देण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ही इतिहासाचा अमूल्य ठेवा असून त्यांच्याशी राज्यातील जनतेच्या भावना निगडित आहेत. ही वाघनखे ब्रिटन येथून देशात परत आणण्याचे नियोजित आहे. सदर वाघनखांचे हस्तांतरण व्यक्तिशः जबाबदारीने व काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. यासाठी, मा. मंत्री (सां.का.), प्रधान सचिव (सां.का.) व संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांचे शिष्टमंडळ लंडन येथील व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियम व अन्य म्युझियमना दि. २९.०९.२०२३ ते ०४.१०.२०२३ या कालावधीत भेट देणार आहेत. त्यामुळे या शिष्टमंडळाच्या दौऱ्यासाठी येणाऱ्या रू. ५०,१४,५५०/- इतक्या रकमेच्या खर्चास प्रशासकीय मंजूरी देण्याची बाब विचाराधीन होती.
या शासन निर्णयान्वये वरील शिष्टमंडळाच्या दौऱ्यासाठी येणाऱ्या रू. ५०,१४,५५० इतक्या रकमेच्या खर्चास प्रशासकीय मंजूरी देण्यात येत आहे.
यासाठी होणारा खर्च मागणी क्रमांक झेडडी २. कला व संस्कृती, प्रचालन, (१३) स्वातंत्र्याचा अमृत ०२. महोत्सवांतर्गत (१३) (०१) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातर्गत कार्यक्रम (कार्यक्रम) (२२०५ ३७३३) ५० इतर खर्च या लेखाशिर्षातील सन २०२३ २४ या वित्तीय वर्षातील उपलब्ध निधीतून भागविण्यात यावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा सांकेतांक २०२३०९०६१७११०४४२२३ असा आहे.