नवी दिल्ली : पुणे रेल्वे स्थानकातील एका सुरक्षा रक्षकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल VIDEO VIRAL होतो आहे. रेल्वे स्थानकावर उपस्थित सुरक्षा रक्षकांच्या शौर्याचा व्हिडिओ भारतीय रेल्वेने सोशल मीडिया हँडल एक्स वर शेअर केला आहे. ज्यामध्ये एक प्रवासी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना ट्रेनच्या धडकेने तो प्लॅटफॉर्मवर पडला. ट्रेन आणि प्लॅटफॉर्मदरम्यान अडकलेल्या तरुणाला पाहून सुरक्षा कर्मचारी ताबडतोब तिथे धावत येताना दिसतो आहे. तो तत्परता दाखवतो आणि पटकन त्या तरुणाला आपल्याकडे खेचतो. या सुरक्षारक्षकाच्या तत्परतेनेच या तरुणाचे प्राण वाचले आहेत.
प्लॅटफॉर्मवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झाला. एमएसएफ कर्मचारी दिगंबर देसाई यांच्या तत्परतेने आणि धाडसाने पुणे स्थानकावरील गोंधळादरम्यान उद्यान एक्स्प्रेसमधील अपघातातून एका प्रवाशाचे प्राण वाचले आहेत.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये डीआरएम पुणे यांनी प्रवाशांना चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये, असा निष्काळजीपणा तुमच्या जीवाला धोका ठरू शकतो. असे आवाहन करण्यात आले आहे.