छत्रपती संभाजीनगर : नशा हे नाशाचे दुसरे नाव आहे. तुमचा पाल्य व्यसनांच्या विळख्यात अडकतोय का ? पालकांनी मुलांकडे वेळीच लक्ष देणे महत्वाचे असे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या संकल्पनेतुन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हयात आज “अंमली पदार्थ विरोधी अभियान ” राबविण्यात आले आहे.
तरुण मुले व त्यांचे पालक यांना अंमली पदार्थ व नशेच्या पदार्थाचे सेवनाने होणारे दुष्परिणाम, नशा करणा-या व्यक्तीची अल्पावधीत ओळख पटवणे, नशेकरिता रोजच्या वापरात येणा-या दैनंदिन संसाधनाचा वापर इत्यादी बाबत विस्तृत माहिती दिली. या अनुषंगाने जनजागृती करून नशेच्या सेवनाच्या विळाख्यात तरुणाई जावु नये या दृष्टीकोनातुन पोलीस अधीक्षक यांचे संकल्पनेतुन जिल्हयातील सर्व उपविभागीय व जिल्हास्तरावर युथ हॉलीबॉल स्पर्धा – 2024 चे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये उपविभागस्तरावर एकुण 30 संघांनी सहभाग नोंदविला होता. या सर्व संघादरम्यान मागील एक आठवडयापासुन साखळी सामने होवुन यातील उपविभागीय स्तरावरिल विजेत्या 06 संघाची निवड करण्यात आली होती. या सर्व विजेत्या संघाचे दरम्यान जिल्हास्तरीय युथ हॉलीबॉल स्पर्धा – 2024 सामान्याचे आयोजन हे दिनांक 12/03/2024 रोजी सायं 19:30 वाजेला मा. पोलीस अधीक्षक यांचे प्रमुख उपस्थितीत , पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, येथे करण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक यांचे हस्ते स्पर्धांचे उद्घाटन करण्यात येवुन यातील सहभागी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, पैठण, सिल्लोड, कन्नड, वैजापुर, गंगापुर या 06 उपविभागाच्या संघातील खेळाडुचा परिचय करण्यात येवुन युथ हॉलीबॉल स्पर्धांना सुरूवात करण्यात आली. यातील अंतीम सामाना हा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण व गंगापुर उपविभागाच्या संघा दरम्यान होवुन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण संघाने सरसी करत विजेते पद पटकावले तर गंगापुर विभागाचा संघ हा उपविजता ठरला आहे.
या खेळाचे प्रायोजकत्व असलेले आर.एल. स्टील यांचे माध्यमांतुन विजेता संघ छत्रपती संभाजीनगर ग्रामीण उपविभाग यांना ट्राफी, 21,000/- बक्षीस, व ट्रकसुट तर उपविजेता गंगापुर उपविभाग संघास ट्रॉफी, 11,000/- बक्षीस, ट्रकसुट असे मा. पोलीस अधीक्षक यांचे हस्ते प्रदान करण्यात आले आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक यांनी उपस्थित खेळाडु व पालकांना मार्गदर्शन करतांना सांगितले कि, खेळ हा “ से नो ड्रग्स ” हा संदेश देण्याचे प्रभावी माध्यम असल्याने यामुळे तरुणाईशी संपर्क साधणे अत्यंत सुकर होते. त्यामुळे या जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामुळे मुलांना व त्यांच्या पालकांना ड्रग्ज व त्याचे दुष्परिणामाबाबत माहिती देता येईल. याचप्रमाणे जिल्हा पोलीस सुध्दा सातत्याने अंमली पदार्थांचे विरुध्द कारवाई करत असुन यामध्ये कायम सातत्य ठेवण्यात येणार आहे. कुठल्याही अंमलीपदार्थ विक्रेता, साठवणुकदार याची गय न करता त्याचे विरुध्द सक्त व कठोर कारवाई करणे सुरू आहे. जिल्हा पोलीसा मार्फत नो ड्रग्स या मोहीमे अंतर्गत नागरिकामध्ये जनजागृती होण्यासाठी मोठयाप्रमाणावर याबाबत माहिती असलेले दिनदर्शिका, भिंतीपत्रक, पॉम्पलेट इत्यादीचे वाटप करण्यात येवुन या अनुषंगाने सोशलमिडयावर असलेले शॉटफिल्म सुध्दा दाखविण्यात आली आहे.
आजच्या आधुनिकतेच्या काळात मुलं सोशलमिडीयावर खुप सक्रिय तसेच महत्वकांक्षी झालेली आहेत. इंटरनेटच्या अधिक वापरामुळे मुले नको त्या गोष्टीकडे वळण घेत आहे. यामुळे पालकांनी मुलांच्या चांगल्या व वाईट सर्व कामाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मुलांमध्ये नशेच्या वाढत्या प्रमाणाला थांबवायचे असल्यास पालकांनी मुलांना योग्य मार्गदर्शन, सोयीस्कर संगोपन, यासह मुलांच्या दैनंदिन दिनचर्या, त्यांचे मित्र, वर्गमित्र, मुले कोणाला भेटतात, कुठे जातात – येतात, त्यांचा वेळ ते कुठे व किती घालवता यावर पालकांनी लक्ष देणे महत्वाचे आहे. किशोरवयामध्ये मुलांकडे अधिकचे लक्ष देणे गरजेचे असते, पालकांनी कामाच्या व्यस्ततेचा बहाणा करून मुलांवर आंधळा विश्वास ठेवल्यास मुलांच्या येणा-या उज्वल भविष्याला ते उदध्वस्ततेकडे वळवतात. सर्वात महत्वाचे म्हणजे पालकांनी मुलांन समोर नशा करणे कटाक्षाने टाळले पाहिजे. कारण मुले याचीच पुनरावृत्ती करतात आणि प्रामुख्याने येथुन ते व्यसनाकडे वळतात. याचप्रमाणे अभ्यासाचा ताण, नापास होण्याची भिती, प्रेमभंग, कौटोंबिक कलह, संवादाचा अभाव, इत्यादी सारख्या अनेक कारणामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा येवुन त्यांच्यात नैराश्याची भावना निर्माण होते आणि यातुन अशी मुले ही व्यसनाच्या आहारी जातात. त्यांच्या मध्ये प्रामुख्याने डोळे लाल, नितेज, व डोळयाखाली सुज येणे, बोलतांना अडखळणे, वजन कमी होणे, भुक न लागणे, ओठ व नखे निळसर पडणे, तोंड कोरडे, व सतत खोकला, रक्तदाब ह्रदयाचे ठोके कमी होणे, यासह मुलांच्या वागण्यात अचानक बदल होवुन, एकटा राहणे अधीक पसंत करणे यासारखी लक्षणे ही ड्रग्स घेणा-या मध्ये आढळुन येतात.
शालेय, महाविद्यालयातील किशोरवयीन मुलांन मध्ये दारु, सिगारेट,गांजा, फेवीबॉड, हुक्का, व्हाईटनर,झेंडुबाम, कफ सिरफ, बटनगोळी, ब्राऊन शुगर, वेदनाशामक गोळयाचे अति सेवना द्वारे नशा करण्याचे प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. आपल्या आजु बाजुला याप्रकारचे कोणी व्यसन करत असले तर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच याला अटकाव घालणे गरजेचे असल्याने याकरिता आपण सुजान नागरिक म्हणुन महत्वाची भुमीका बजावुन अंमली पदार्थाचे व्यसनांचे आहारी गेलेल्या मुलांचे/व्यक्तीचे पुनर्वसन करिता सक्रिय भाग घेवुन टेलीमानस टोल फ्री क्रमांक 14416 यावर संपर्क करून वैद्यकिय अधिकारी यांचा सल्ला घ्यावा. किंवा पोलीस कार्यवाही करिता 9422592748 या क्रमांकावर संपर्क साधवा. कारण आपल्याच एक जुटीने हे युध्द जिंकुया, ड्रग्स मुक्त भारत हिच एक जिद्द असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना केले आहे.
नमुद कार्यक्रम प्रसंगी मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक , मा. पुजा नागरे , उपविभागीय पोलीस अधिकारी, यांचे सह आर.एल. स्टिल चे संचालक नितीन गुप्ता, एच.आर. विकास बावस्कर , स्था.गु. शा. पोलीस निरीक्षक, सतिष वाघ, रापोनि अण्णासाहेब वाघमोडे यांचेसह मोठयाप्रमाणावर पोलीस अधिकारी, अंमलदार, खेळाडु व पालक उपस्थित होते. या स्पर्धांचे यशस्वी नियोजनामध्ये श्रीमती कोमल शिंदे स.पो.नि. यांन विशेष परिश्रम घेतले आहे.