महाराष्ट्र : सध्या एकीकडे कडक उन्हाळा सुरू आहे. सकाळपासूनच मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णतेने नागरिक हैराण झाले असतानाच दुपारनंतर अचानक अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह Rain , वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाने सुरुवात झाली.
पावसामुळे वातावरणात काहीसा थंडावा आल्यानं नागरिक सुखावले असले तरी शेतकरी मात्र नाराज झाले आहेत. कारण या पावसामुळे मोठा नुकसान शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.
दरम्यान आज दुपारनंतर अहमदनगर, जळगाव, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह तुफान पावसानं हजेरी लावली. कोकणामध्ये देखील पावसानं जोरदार तडाखा दिलाय. दरम्यान दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटातील काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
उन्हाळ्याने या वर्षी देखील जोरदार तडाखा दिला असला तरी या वर्षांमध्ये मान्सूनचं आगमन लवकर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.