Railway Job: सरकारी नोकरी किंवा रेल्वेत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. हल्लीच्या जगात सगळ्यांनाच स्थिर नोकरी पाहिजे असते. पण त्या विषयी माहिती फार कमी लोकानांच असते. अशातच आता रेल्वेच्या भरती निघतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. रेल्वे हे सर्वात लोकप्रिय क्षेत्र आहे. रेल्वेत TTEची नोकरी सर्वात आकर्षक मानली जाते. तुम्हालाही रेल्वेमध्ये टीटीई म्हणून काम करायचे असेल तर ही बातमी तुसमच्यासाठी खास आहे. आज आपण टीटीईची निवड प्रक्रिया, आवश्यक पात्रता, शिक्षण, पगार याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
TTE चे काम काय असते ?
TTE चा फुल फॉर्म Travelling Ticket Examiner असा आहे. TTE हा व्यक्ती भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी तैनात केलेला असतो. हा व्यक्ती सर्व प्रवाशांची तिकिटे तपासतो आणि त्यांना त्यांची नेमकी जागा सांगतो. तसेच प्रवाशांच्या तक्रारींची नोंदवणे आणि त्या सोडवण्याची जबाबदारीही टीटीईची असते. एखाद्या प्रवाशाकडे प्रवासाचे तिकीट नसेल, तर टीटीई त्याला नियमानुसार दंडही ठोठावू शकतो.
TTE कसे बनायचे ?
भारतीय रेल्वेकडून वेळोवेळी TTE च्या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली जाते. त्यावेळी इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. या अर्जात आवश्यक माहिती व कागदपत्रे जोडावी लागतात. त्यांतर पात्र उमेदवारांची परिक्षा घेतली जाते. परीक्षेत सामान्य ज्ञान, गणित या विषयांवर प्रश्न विचारले जातात. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये टीटीई बनू शकता.
आणखी वाचा – Vodafone Idea : आता अवघ्या २३ रुपयांत मिळणार रिचार्ज, कोणती आहे ‘ही’ कंपनी? जाणून घ्या माहिती
परिक्षेचे स्वरूप
TTE च्या परीक्षेत एकूण 150 प्रश्न विचारले जातात. यामध्ये गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न असतात. तसेच रेल्वेशी संबंधितदेखील काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. 150 गुणांची ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, उमेदवाराला प्रथम विशिष्ट ट्रेन आणि स्टेशनवर प्रशिक्षण दिले जाते आणि त्यानंतर त्याला कामावर पाठवले जाते. TTE ला 30 ते 35 हजारांपर्यंत पगार मिळतो.
पात्रता
TTE होण्यासाठी उमेदवाराला 12वीत 50% गुण असणे आवश्यक आहे. तसेच, TTE होण्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच तुमचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे. मात्र SC/ST आणि OBC या प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाच्या नियमानुसार वयात सुट दिली जाते. या नोकरीसाठी तुमची दृष्टी चांगली असली पाहिजे. जर तुमची दृष्टी खराब असेल तर तुम्हाला नोकरी मिळू शकणार नाही.