मुंबई : नाशिक मधील डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मृत्यू तांडव प्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, औषध खरेदीत गैरव्यवहार होत आहे. औषधांचा तुटवडा राज्यभर असून मंत्री म्हणत आहेत की
औषध मुबलक आहेत. पण प्रत्यक्षात औषधांचा खडखडाट आहे. मग असा दावा करणारे हे नेमके मंत्री कोण आहेत ? आरोग्य खातं विभागलं गेलं आहे. औषधांच्या मुबलकतेबाबत मंत्री दावा करत असताना दुसरीकडे चंद्रपूरच्या एका महिलेचा व्हिडिओ फिरत आहे. औषध बाहेरून आणण्यास सांगितलं असल्याचं ही महिला व्हिडिओत सांगत आहे. मग पंतप्रधानांच्या योजना, महाराष्ट्र सरकारच्या योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून हा सगळा खर्च केला जाणार आहे का ? या योजनांमधून मदत कोणाला दिली जाते ? ही बिल खरी आहेत का ? हा संशोधनाचा विषय आहे. असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हणाले आहेत.
खेकड्यांच्या हातात कारभार गेला आहे का ? ते भ्रष्टाचाराचं पाणी आपल्याकडे वळवत आहेत का ? स्वतःच्या जाहिराती करायला पैसे आहेत, गुजरातमध्ये जाण्यास पैसे आहेत, सुरतेमध्ये जाण्यास पैसे आहेत, गोव्यात जाऊन टेबलवर नाचायला पैसे आहेत … पण महाराष्ट्रातील रुग्णांचे जीव वाचवायला पैसे नाहीत …? असा देखील घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.