पुणे : स्त्रियांना शिक्षणाची कवाडे उगडून देणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी बुधवार पेठेतील भिडे वाडा येथे पहिली शाळा सुरु केली होती. गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती. परंतु न्यायलयात सुरु असणाऱ्या खटल्यामुळे कायदेशीर अडचणी निर्माण झाली होती. आज उच्च न्यायालयाने महापलिका तसेच सरकारच्या बाजूने आपला निकाल दिला आहे. यानंतर भारतीय जनता पार्टी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना कसबा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख हेमंत रासने म्हणाले, आजच्या क्षणाची लाखो नागरिक वाट पाहत होते. देशातील मुलींची पहिली शाळा भिडे वाडा येथे सुरु करण्यात आली होती, न्यायलयाने महापलिका आणि सरकारच्या बाजूने निर्णय दिल्याने आता राष्ट्रीय स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मी मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानतो, त्यांच्या प्रयत्नांतून आज हा ऐतिहासिक क्षण आपल्या सर्वांच्या वाट्याला आला आहे.
कसबा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र काकडे, नगरसेवक योगेश समेळ ,मनिषा लडकत, संजयमामा देशमुख. युवा मोर्चा अध्यक्ष अमित कंक,धनंजय जाधव, पुष्कर तुळजापूरकर,किरण जगदाळे, संदिप लडकत, यशोधन आखाडे, तुषार रायकर, चंद्रकांत पोटे, जयदिप शिंदे,प्रणव गंजीवाले, निर्मल हरिहर, सनी पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
भिडेवाड्यातील भाडेकरू संदर्भातील वाद न्यायालयात होता. यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाची भूमिका बजावण्यात आली. भिडे वाड्यातील काही भाडेकरूंनी रोख मोबदला मागितला होता. महापालिकेकडून त्याची तयारी देखील दर्शवण्यात आली होती. परंतु हा वाद न्यायलयात गेल्याने कामाला विलंब होत गेला. अखेर हा खटला पालिकेने जिंकल्याने भिडे वाड्याचे स्मारक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी पालकमंत्री या नात्याने महत्वपूर्ण असे प्रयत्न केले गेले. राज्य शासनाच्या माध्यमातून देखील सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याने हे यश मिळाले आहे.