पंढरपूर : कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबर 2023 ला आहे. यानिमित्ताने राज्यातील लाखो भाविक पंढरपूरला येत असतात. अशातच भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीतजास्त भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून देवाचे राजोपचार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पंढरपूर मंदिरात 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात येणार आहे. यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मंदिर 24 तास दर्शनासाठी उघडे राहणार असल्याने रांगेत उभं राहण्याचा कालावधी कमी होणार आहे. आज सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास देवाचा पोशाख आणि शेजारतीनंतर विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात येणार आहे.
कार्तिकी यात्रा संपल्यानंतर 1 डिसेंबर रोजी विठूरायाची प्रत्यक्ष पूजा होणार असून या दिवसापासून पुन्हा देवाचे नित्योपचार सुरू होणार आहे.