पुणे : येत्या मंगळवार पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी तपकीर गल्ली बुधवार पेठेतील नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट ने यंदाही उत्सवाचे वेगळेपण जपत एक सकारात्मक संदेश देण्याच्या हेतू ने यंदा श्रींची प्राणप्रतिष्ठा तृतीयपंथी नेत्या श्रीगौरी सावंत यांच्या हस्ते करण्याचे जाहीर केले आहे.
एका तृतीयपंथी समाजच्या व्यक्तीने गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना ठरणार आहे. याबाबत माहिती देताना ट्रस्टचे मुख्य विश्वस्त पुष्कर तुळजापूरकर म्हणाले की ‘ हा सार्वजनिक उत्सव आहे ह्या उत्सवात सर्व जात धर्म पंथाचे पुरुष महिला आबालवृद्ध सहभागी होत असताना तृतीयपंथी समाजाचा सहभाग होत असताना अतिशय आनंद होतोय ज्यांना समाजाने आजवर झिडकरात हीन वागणूक दिली त्यांना हा बहुमान देणे हे आमचे भाग्य आहे यातुन समाजात एक सकारात्मक संदेश नक्की पोहोचल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
दिनांक १९/९/२०२३ रोजी संध्याकाळी ८.००वाजता श्रीगौरी सावंत यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा संपन्न होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले