Baby Whale Died : दोन दिवसाआधी रत्नागिरी येथील गणपतीपुळेच्या (Ganpatipule) समुद्र किनारी एक बेबी व्हेल (Baby Whale) मासा आला होता. या बेबी व्हेल माशाला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले. अखेर ४० तासानंतर त्या बेबी व्हेलला समुद्रात सोडण्यात यंत्रणेला यश आलं. पण आता हाती आलेल्या वृत्तानुसार, ज्या बेबी व्हेल मासाचे प्राण वाचवले होते तो अखेर मृत्यूमुखी पडला. (Baby Whale Died)
15 नोव्हेंबरला पुन्हा पाण्यातही सोडलं होतं. पण संध्याकाळी तो पुन्हा किनार्यावर आला अणि अखेर त्याचा मृत्यू झाला. 13 नोव्हेंबरला पहिल्यांदा हा मासा दिसला होता. त्यानंतर सुदैवाने त्याला डिहायड्रेशन किंवा त्याची इंद्रिय बंद पडण्याची समस्या न आल्याने त्याला अनेकदा पाण्यात सोडले होते पण ओहोटीच्या पाण्याने तो पुन्हा समुद्रकिनारी आला होता.
पुन्हा बेबी व्हेल समुद्रकिनारी कसा आला?
गणपतीपुळ्यात MTDC च्या रिसॉर्ट जवळच व्हेल मासा वाळूत रूतल्याचं निदर्शनास आलं. नंतर प्राणी, मत्स्यतज्ञ, वनविभाग, ग्रामस्थ, मच्छिमार सार्यांनीच त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले होते. जेसीबीचा वापर करून त्याची वाळूतून सुटका देखील करण्यात आली होती. शरीरावरील त्वचा मृत पडू नये म्हणून पिल्लाला जगवण्यासाठी ओल्या कापडात गुंडाळून वारंवार वारंवार पाणी मारले जात होते. सलाईन आणि अॅन्टिबायोटिकचा वापर केला होता. तटरक्षक दलाच्या नौकांच्या मदतीने त्याला किनार्यापासून दूर खोल समुद्रात सोडण्यात आले पण तो पुन्हा परत आला आणि 40 तासांपासून त्याला जगवण्याची सारी धडपड संपली.
आणखी वाचा – Cervical Cancer : भारतात दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे 77 हजार महिलांचा मृत्यू
व्हेल मासा शरीराने अवाढव्य असतो. पाण्यात तो तरंगत असल्याने स्वतःच्या शरीराचं त्याला वजन जाणवत नाही पण किनार्यावर आल्यास त्याच्या वजनानेच काही इंद्रियं दबली जातात आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू होतो. त्या तुलनेत या बेबी व्हेलने खूपच जिद्द दाखवली पण तो फार काळ तग धरू शकला नाही.