INFORMATIVE : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या जुन्या नोंदी तपासल्या तर निवडणूक आयोगाचे कर्मचारी एम.एस. सेथी यांनी काही निवडणूक चिन्हांचं रेखाटन केलं होतं. 90 च्या दशकात 1992 सालच्या सप्टेंबर महिन्यात ते सेवेतून निवृत्त झाले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नियुक्त केलेले शेवटचे ड्राफ्ट्समन म्हणून देखील ओळख असल्याचं पाहायला मिळतं.
एक वृत्तपत्राने छापलेल्या एका लेखात असे नमूद आहे की सेथी आणि त्यांचे काही निवडणूक आयोगातील सहकारी जेव्हा एकत्र बसलेले असायचे तेव्हा ते प्रत्येक मतदाराला निवडणूक चिन्ह हे सहजासहजी ओळखता यावे यासाठी सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या वापरात असणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत यासंदर्भात चर्चा करत असतं. आणि याच चर्चेतून त्यांना रेखाटलेल्या सायकल, हत्ती, झाडू, कमळ आणि घड्याळ अशा राखीव असलेल्या चिन्हांचा उगम झाला होता. त्यांनी रेखाटलेली अशी काही निवडक चिन्हे सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर काही विशिष्ठ पक्षांसाठी राखीव ठेवलेली आहेत.