भारतात यूनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच ‘यूपीआय’ पेमेंट्सचे प्रमाण प्रचंड वाढले असून आपल्यापैकी बरेच जण किराणा खरेदी करण्यासाठी, लाइट बिल भरण्यासाठी, रिचार्ज करण्यासाठी एवढेच नाही तर भाडे भरण्यासाठी यूपीआयचा वापर करतात. मात्र काहीवेळा व्हॉट्सअप यूपीआय किंवा अन्य थर्ड पार्टी यूपीआयमार्फत होणारे व्यवहार अडकण्याची शयता असते. आपल्या खात्यातून पैसे कट झाल्यानंतर समोरील व्यक्तीस पैसे मिळाले नसल्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आला असेल.
‘एस’ या सोशल मीडियावर एसबीआयच्या ग्राहकाने एक पोस्ट केली असून त्यात म्हटले, आपण ३५०० रुपये व्हॉट्सअप यूपीआयमार्फत स्थानांतरित केले. ती रक्कम माझ्या खात्यातून वळती झाली, मात्र मित्राच्या खात्यावर अद्याप जमा झाली नाही. हे पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल किंवा कोणत्या प्रक्रियेचे पालन करावे लागेल, अशी विचारणा केली. यावर एसबीआयने म्हटले, आपली तक्रार https://crcf.sbi.co.in/ccf वर नोंदवा. त्यानंतर ऊळसळींरश्र झरूाशपीं चा पर्याय निवडा. तेथे विवरण भरा, असे उत्तर दिले. सबंधितांची तक्रार दाखल झाल्यानंतर एसबीआयची टीम या प्रकरणात लक्ष घालते. ग्राहकाकडून तक्रारीची नोंद झाल्यानंतर संबंधिताला तक्रार क्रमांक प्राप्त होतो. हा क्रमांक मेल आयडी आणि मोबाईल नंबरवर येतो. ही तक्रार टॅट म्हणजेच ‘टर्न अराउंड टाइम’ कडून हाताळली जाते. बहुतांश अपयशी ठरलेल्या व्यवहाराचे रिफंड हे त्याच्या खात्यात जमा होते. काही वेळा वेळही लागू शकतो. एका तासात रिफंड जमा झाला नाही तर बँकेच्या कस्टमर सपोर्टला कॉल करणे गरजेचे आहे.
व्हॉटसअपवरुन पैसे कसे पाठवावे
एकदा आपले खाते व्हॉट्सअॅपला लिंक झाले की पैसे पाठवू शकतो आणि मिळवू देखील शकतो. यासाठी व्हॉट्सअॅपला बँक खाते जोडणे गरजेचे आहे. यासाठी व्हॉट्सअॅपचा नंबर आणि बँक खात्याला जोडलेला मोबाईल नंबर एकच असणे आवश्यक आहे. त्यानुसार यूपीआय सुविधेचा लाभ घेत काही क्षणात पैसे ट्रान्सफर करू शकता.
पहिली पायरी : एकदा व्हॉट्सअॅपला खाते लिंक झाल्यानंतर ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत, त्या व्यक्तीची निवड करा. त्यानंतर पेमेंट ऑप्शनचा पर्याय निवडल्यानंतर चॅट विंडो सुरू करा. संबंधित व्यक्तीचा यूपीआय आयडीचा वापर करून पैसे ट्रान्सफर करू शकतो. जसे की आपण गूगल पे किंवा फोन पे, भीम अॅपला करतो.
दुसरी पायरी : त्यानंतर रक्कम टाका आणि यूपीआय पीन आयडी द्या. अचूक यूपीआय पीन दिल्यानंतर आपल्या खात्यातून ती रक्कम समोरील व्यक्तीच्या बँक
खात्यात जमा होते. १० ऑटोबर २०२३ रोजी एनपीसीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले, सेवा किंवा साहत्यिक खरेदीसंदर्भातील व्यवहार पूर्ण न झाल्यास व समोरील व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा झाले नसेल किंवा चुकीची रक्कम ट्रान्सफर झाली असेल किंवा चुकीच्या व्यक्तीकडे पैसे गेले असतील तर ग्राहकांनीतात्काळ बँकेत जावे आणि तक्रार नोंदवावी.
ग्राहक हा आपल्या बँकेच्या माध्यमातून अवास्तव शुल्क, प्री आर्बिट्रेशन, कमिशन यासंदर्भातील दाद मागू शकतो. यूपीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पैसे ट्रान्सफर करणार्या बँकेने उपस्थित केलेल्या वादाचे निराकरण करण्यासाठी पैसे स्वीकारणार्या किंवा न स्वीकारणार्या बँकेने पुरावे सादर करणे गरजेचे आहे.