थायरॉईड हा एक आजार आहे जो लोकांमध्ये झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लोकांनी याबाबत जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे. थायरॉईड अवेअरनेस Thyroid Awareness मंथ 2024 Month 2024 च्या निमित्ताने या आजारा विषयी आज माहिती जाणून घेऊयात.
हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम असे थायरॉईडचे विकार दोन प्रकारचे असतात. हायपोथायरॉईडीझममध्ये थायरॉईड ग्रंथी गरजेपेक्षा कमी थायरॉईड संप्रेरक तयार करते, तर हायपरथायरॉईडीझममध्ये थायरॉईड ग्रंथी अतिसक्रिय होते, ज्यामुळे ती अधिक थायरॉईड संप्रेरक तयार करण्यास सुरवात करते. या दोन्ही परिस्थितीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे हा विकार टाळणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या जीवनशैलीत काही बदल करून तुम्ही स्वत:ला या आजारापासून वाचवू शकता. चला तर मग जाणून घेऊया, थायरॉईडमुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात.
ताणतणावाचे आपल्या आरोग्यावर बरेच नकारात्मक परिणाम होतात. या प्रभावांमध्ये थायरॉईड ग्रंथीतील विकारांचा देखील समावेश आहे. खरं तर तणावामुळे थायरॉईड ग्रंथी नीट काम करू शकत नाही. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट तंत्राचा अवलंब करा. योग, मेडिटेशन आदींच्या मदतीने तणाव कमी करता येतो.
आयोडीन युक्त पदार्थ Iodine-rich foods
आपल्या आहाराचा परिणाम आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावर होतो. अन्नात आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉईड ग्रंथी नीट काम करू शकत नाही. त्यामुळे आयोडीनची कमतरता भासू नये म्हणून जेवणात आयोडीनयुक्त मीठ आणि खाद्यपदार्थांचा समावेश करावा. तसेच त्याचे प्रमाण जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी. ओव्हरडोस देखील हानिकारक असू शकतो.
व्यायाम
व्यायाम केल्याने तुमचे आरोग्य निरोगी राहते. व्यायाम केल्याने थायरॉईड ग्रंथी अधिक चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत होते. वेगवान चालणे किंवा सायकल चालविणे यासारखे व्यायाम वजन टिकवून ठेवण्यास आणि चयापचय सक्रिय ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे थायरॉईडची समस्या टाळण्यास ही मदत होते.
धूम्रपान करू नका
धूम्रपान केल्याने आपल्या थायरॉईड ग्रंथीवर खूप नकारात्मक परिणाम होतो. धूम्रपानामुळे शरीरात येणारी रसायने, थायरॉईड संप्रेरकांवर परिणाम होतो. यामुळे तुम्हाला कॅन्सरचा ही धोका असतो. त्यामुळे धूम्रपान करू नका.
पुरेशी झोप घ्या Get enough sleep
झोपेची कमतरता आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. झोप ेच्या कमतरतेमुळे आपल्या हार्मोनल ग्रंथी चांगल्या प्रकारे काम करू शकत नाहीत. त्यामुळे दररोज ७-८ तास ांची शांत झोप घ्या.