फळांमध्ये सफरचंद खूप पौष्टिक मानले जाते. एक म्हण आहे, जर तुम्ही रोज सफरचंद खाल्ले तर अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतात. सफरचंदामध्ये फायबर, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी कॅल्शियम, लोह आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात, परंतु बऱ्याचदा सफरचंद खाण्याची योग्य वेळ कोणती याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम असतो. अशापरिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या वेळी सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो आणि कोणत्या वेळी खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
सफरचंद किती वाजता खावे?
सफरचंदात नैसर्गिक साखर आणि फ्रुक्टोज असते, त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी खाणे अधिक फायदेशीर ठरते. ते खाल्ल्याने तुम्ही दिवसभर अॅक्टिव्ह राहाल. तसेच यामध्ये फायबर आढळते. सफरचंद खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
सफरचंदात असलेले फायबर पचनही निरोगी ठेवते, त्यामुळे सकाळी सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठतेसारख्या समस्या टाळता येतात. याशिवाय यात व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम देखील असते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासून आराम मिळतो.
सफरचंद कधी खाऊ नये?
सफरचंद कधीही रात्री खाऊ नये. यामध्ये शुगर आणि फ्रुक्टोज आढळतात, ज्यामुळे आपल्याला अॅक्टिव्ह वाटतं, पण रात्री ते खाल्ल्याने झोपेची समस्या उद्भवते.