मुंबई : दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांचा ‘सत्या’ हा चित्रपट (Satya Movie ) प्रदर्शित होताच फ्लॉप ठरला होता. हा क्लासिक चित्रपट मानला जातो. सत्या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. २५ वर्षांनंतरही सत्या हा चित्रपट लोकांच्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत कायम आहे. मनोज बाजपेयीच्या (Manoj Vajpayee) पात्राला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. सत्यासारखा क्लासिक चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपटगृहांमध्ये फ्लॉप जरी ठरला असला तरी प्रेक्षकांच्या मनात मनोज बाजपेयीच्या भुमिकेने घर केलं.
निर्मात्यांना काळजी वाटू लागली होती
3 जुलै 1998 रोजी प्रदर्शित झालेला सत्या चित्रपट पाहण्यासाठी केवळ 20-30 लोकच थिएटरमध्ये दिसले होते. एका उत्तम चित्रपटाला असा प्रतिसाद मिळाल्यावर निर्मात्यांना काळजी वाटू लागली. पण काही दिवसातच हा चित्रपट वर्ड ऑफ माऊथ पब्लिसिटीने हिट झाला आणि पुढे एक मोठा इतिहास बनला . या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये सुरू असलेल्या रोमँटिक चित्रपटांचा ट्रेंडही बदलला. या चित्रपटानंतर मनोज बाजपेयींना इंडस्ट्रीत काम मिळू लागलं. अभिनेता या चित्रपटाला त्याच्या करिअरचा गेम चेंजर देखील म्हणतो. या चित्रपटामुळे दिग्दर्शकांमध्येही बाजपेयीला ओळख मिळू लागली.
एकापेक्षा एक हिट चित्रपट
मनोज बाजपेयीने हिंदी चित्रपटसृष्टीत तीन दशकांहून अधिक काळ घालवला आहे. मनोज बाजपेयीने आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. तसेच वेबसिरिजमध्ये देखील मनं जिंकणारे अनेक पात्र साकारले आहेत. गँग्स ऑफ वासेपूर, गुलमोहर, सत्या, शूल हे असे काही चित्रपट आहेत जे क्लास सिनेमाची उदाहरणे आहेत. मनोज बाजपेयीने या चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मनं जिंकली आहेत. सत्या या चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला.