Rajinikanth’s grandson : दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांचा नातू आणि धनुषचा मोठा मुलगा यात्रा राजाला ट्रॅफिक पोलिसांनी दंड आकारला आहे. यात्रा हा आता 17 वर्षांचा आहे. तर अल्पवयीनं असताना तो गाडी चालवत होता आणि त्यातही त्यानं ट्रॅफिकचे नियम मोडले आहेत. यासोबत त्यानं हेलमेट परिधान केलं नव्हतं किंवा त्याच्याकडे लायसन्स देखील नव्हतं. कोणतेही कागदपत्रे नसताना तो सुपरबाईक चालवत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्याला चेन्नईच्या पोएस गार्डन परिसरात सुपरबाइक चालवताना पोलिसांनी पकडलं. त्याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (rajinikanths grandson and dhanushs yatra raja fined traffic Police)
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत यात्रा राजाला एक गाइड ट्रेनरच्या मदतीनं रस्त्यावर फिरताना पाहिले. त्यावरून असं वाटतंय की तो बाईक चालवणं शिकत आहे. खरंतर, व्हिडीओ समोर आल्यानंतर ज्या गोष्टीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं, ते म्हणजे त्यानं हेलमेट परिधान नव्हतं केलं आणि नाही त्याच्या बाईकवर असलेली नंबर प्लेट स्पष्ट दिसत होती. दरम्यान, असे म्हटले जातं की जेव्हा अधिकाऱ्यांनी धनूष आणि त्यांच्या मुलाशी संपर्क साधला तेव्हा लक्षात आलं की यात्रा राजाकडे ड्रायव्हिंग लायसेंस देखील नव्हतं. व्हिडीओत नक्की तोच यात्रा राजा आहे की नाही हे तपासण्यासाठी पोलिसांनी त्याची आई ऐश्वर्या आणि रजनीकांतशी संपर्क साधला.
आणखी वाचा – World Cup Final 2023 PM Modi Visit Dressing Room: खुद्द पंतप्रधान भारतीय खेळाडूंना धीर देण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये…
रिपोर्ट्सनुसार, नियमाचे उल्लंघन केल्यानं ट्रॅफिक पोलिसांनी यात्रा राजाला 1 हजार रुपये दंड म्हणून आकारला आहे. पोलिसांनी या नियमाचे उल्लंघन आणि दंड आकरण्यावर वक्तव्य केलं की हा दंड आकारल्यानं ही गोष्ट स्पष्ट झाली की नियम हे सगळ्यांना सारखेच आहेत. मग ती व्यक्ती कोणत्याही कुटुंबातून असो. चेन्नई ट्रॅफिक पोलिसांनी यात्रा राजाकडून दंड आकरल्यानं सोशल मीडियावर त्यांच्या कामाची चर्चा सुरु असून सगळे त्यांची स्तुती करत आहेत.