प्रकाश राज हे नाव भारतीय चित्रपट सृष्टीत चर्चेत असलेल्या नावांपैकी आहे.सिंगम चित्रपटातील जयकांत शिखरे या खलनायिकाच्या भूमिकेतून प्रकाश राज यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. त्यांचा अनेक खलनायकाच्या भूमिका प्रसिद्ध ठरल्या आहेत. ते सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सध्या त्यांची Twitter वरील पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. भारत 23 ऑगस्ट ला चंद्रावर उड्डाण करणार आहे आणि त्यासाठी भारतच नव्हे तर जग यासाठी उत्सुक असताना प्रकाश राज यांनी ट्विटर एक पोस्ट करून चांद्रयान 3 या मिशनची थट्टा केली आहे. अनेकांनी त्यांना त्या पोस्टसाठी ट्रोल देखील केलं. प्रकाश राज हे कट्टर भाजपाविरोधी असून, अनेकदा त्यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे. पण यावेळी त्यांनी चांद्रयान 3 ला मधे आणल्याने अनेकांनी नाराजी जाहीर केली. दरम्यान, ही टीका होत असतानाच प्रकाश राज यांनी नव्यान ट्विट करत ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.
नेमकं त्या पोस्टमध्ये काय?’
प्रकाश राज यांनी या पोस्टमध्ये इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांचं कार्टून शेअर केलं होतं. या फोटोत के सिवन शर्ट आणि लुंगी घातलेले असून त्यांच्या हातात चहा दिसत आहे तो चहा एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतताना दाखवलं आहे. थोडक्यात, प्रकाश राज यांनी त्यांना चहावाला दाखवलं आहे. हे कार्टून शेअर करताना प्रकाश राज यांनी चंद्रावरुन आलेला पहिला फोटो असा टोला लगावला. ‘विक्रम लँडरने चंद्रावरुन पाठवलेला पहिला फोटो,’ असं प्रकाश राज यांनी लिहिलं होतं.
‘त्या’ पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
प्रकाश राज यांची ही पोस्ट लोकांना अजिबात आवडली नाही अनेकांनी त्यांना ट्विटरवर ट्रोल देखील केलं. अभिनेत्याच्या ट्विटवर एका यूजरने लिहिले- ‘श्री प्रकाशराज आमच्या वैज्ञानिकांचा अपमान करत आहेत, आमच्या इस्रोची खिल्ली उडवत आहेत. त्यांना विचारले पाहिजे की तो हे कोणासाठी करतोय? लज्जास्पद…’ दुसर्या व्यक्तीने टिप्पणी केली- ‘नेत्यांना ट्रोल करणे ठीक आहे पण आपल्या देशाला ट्रोल करणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे…’ दुसर्या युजरने लिहिले- ‘हे पूर्णपणे अनावश्यक होते… अपयशानंतरही उभे राहिलेल्या आमच्या धाडसी शास्त्रज्ञांना आपण निराश करू नये..
प्रकाश राज यांचं टीकाकारांना उत्तर
प्रकाश राज यांनी टीकेला उत्तर देताना, द्वेषाला फक्त द्वेषच दिसतो असं म्हटलं आहे. मी आमच्या केरळच्या चहावाल्याचं सेलिब्रेशन करत आहे असंही ते म्हणाले आहेत. “द्वेषाला फक्त द्वेष दिसतो. मी #Armstrong टाइम्सच्या एका विनोदाचा संदर्भ देत होतो. आमच्या केरळच्या चहावाल्याचं मी सेलिब्रेशन करत आहे. कोणत्या चहावाल्याला यात ट्रोलिंग दिसलं? जर तुम्हाला विनोद कळत नसेल तर तो तुमच्यावर असतो. मोठे व्हा #justasking,” असं उत्तर प्रकाश राज यांनी दिलं आहे.
रशियाचे लूना-२५ या यानाच्या अपयशानंतर चांद्रयान ३ या मोहिमेकडे फक्त भारतच नाही तर अख्खं जग अपेक्षेने बघत आहे. उद्या म्हणजेच २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारत चंद्रावर ६ वाजून ४ मिनिटांनी सॉफ्ट लॅडिंग करणार आहे. ISRO ने ट्वीट करत हे लँडिग कुठे, कधी आणि कसं पाहता येईल याची माहिती दिली आहे. यासाठी तुम्हाला बंगळुरुच्या मिशन कंट्रोल सेंटरमध्ये (Mission Control Centre) जाण्याची गरज नाही.