Pooja Sawant Engagement : पूजा सांवंतला मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. तिनं तिच्या अभिनयाने फक्त मराठीतच नव्हे तर हिंदीतही एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती तिच्या सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेल्या पूजा सावंतने आता चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. (marathi actress pooja sawant secretly engage share photo on instagram)
पूजा सावंतने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही पोस्ट (Pooja sawant post) शेअर केल्या आहेत. यात तिने We are engaged असं म्हणत काही फोटो पोस्ट केले आहे. या फोटोत ती आणि एक मुलगा दिसत असून यात ती तिच्या बोटातील अंगठी दाखवताना दिसत आहे.

“माझ्या आयुष्यातील एका नवीन अध्यायासाठी मी सज्ज झाले आहे. ही प्रेमाची जादू असून आम्ही आमचा सुंदर प्रवास सुरु करत आहोत. We are engaged”, असे पूजा सावंतने त्या कॅप्शन दिले आहे.
पूजाने सलग तीन इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील सर्व फोटोत तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे पूजाचा होणारा नवरा कोण, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

दरम्यान पूजाच्या या पोस्टनंतर अनेक कलाकार यावर कमेंट करताना दिसत आहेत. हेमंत ढोमे, सायली संजीव, तेजस्विनी पंडित, पुष्कर जोग यांसह अनेक सिनेसृष्टीतील कलाकारांनी यावर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.