Pooja Sawant Fiancé Reveal: पूजा सांवंतला मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. तिनं तिच्या अभिनयाने फक्त मराठीतच नव्हे तर हिंदीतही एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती तिच्या सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेल्या पूजा सावंतने आता चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. (Pooja Sawant Fiancé Reveal name and his face share photo on social media instagram)

पूजा सावंतने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही पोस्ट (Pooja sawant post) शेअर केल्या आहेत. यात तिने We are engaged असं म्हणत काही फोटो पोस्ट केले आहे. या फोटोत ती आणि एक मुलगा दिसत असून यात ती तिच्या बोटातील अंगठी दाखवताना दिसत आहे. तिची इन्स्टाग्रामवरील पोस्ट काही क्षणातच चर्चेचा विषय ठरली. त्या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांचे अनेक प्रश्न होते. कोण असेल हा नवरा मुलगा? यावर आता पूजा सांवत ने पोस्ट शेअर (Pooja Sawant Fiancé Reveal) करुन आनंदाची बातमी दिली आहे.
पूजा सांवत आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे पाहा फोटो
अखेर आता पूजा सावंत हिने आपल्या होणाऱ्या पतीचा चेहरा सगळ्यांना दाखवत त्याचं नावही रिव्हील केलं आहे. नुकताच पूजा सावंत हिने एक फोटो शेअर केला असून, यात ती तिच्या होणाऱ्या पतीसोबत दिसली आहे. सोबतच तिने या पोस्टमध्ये त्याला टॅग देखील केलं आहे. पूजा सावंतच्या होणाऱ्या पतीचे नाव सिद्धेश चव्हाण असे आहे. आता चाहत्यांना त्यांच्या लग्नाची घाई पाहायला मिळत आहे. लवकरच हे लग्न बंधणात अडकतील असं सांगितलं जात आहे.