Hania Amir and Babar Azam : हानिया आमिर (Hania Aamir) भारतात फारशी प्रसिद्ध नाही पण शेजारील देश पाकिस्तानमध्ये तिची फॅन फॉलोइंग आहे. ती पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील (Pakistan Film Industry) सर्वाधिक पसंतीची अभिनेत्री आहे. सध्या सुरू असलेल्या आयसीसी विश्वचषकादरम्यान (ICC Worldcup) ती आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र, दोघांनीही याबाबत मौन बाळगले आहे. (hania aamir pakistan actress looks like anushka sharma)
या चर्चा उगाच सुरु झालेल्या नाही, गेल्या काही दिवसात झालेल्या मुलाखतीत आणि सोशल मीडियावर बाबर आजम आणि हानिया आमिर हे एकमेकांची स्तुती करताना दिसले. खरंतर ही स्तुती फक्त अशा प्रकारे करण्यात आली होती की एक पब्लिक फिगर दुसऱ्या सेलिब्रिटीला कसे एडमायर करतात. या सगळ्यात वर्ल्ड कप दरम्यान, एका चाहत्यानं एडिट केलेला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Hania Amir and Babar Azam)
या व्हिडीओमुळे त्या दोघांचा एकमेकांशी संबंध असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच खरंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत आणि इतकंच नाही तर जर ते एकमेकांना डेट करत नसतील तर त्यांनी डेट करायला हवं असं म्हटलं आहे. यात हानिया आमिर, बाबर आजम एकमेकांना स्वत: पेक्षा जास्त क्यूट बोलत आहेत. तर बाबर आजमनं अभिनेत्रीसोबत चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
हे ही वाचा – Madhuri Dixit करणार भाजप प्रवेश? पक्षाकडून खुलासा
हानिया आमिरचे चाहते फक्त बाबर आजमला डेट करण्यापर्यंतचं नाही तर तिची तुलना बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी होत आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या फोटोवर त्या दोघांचे फोटो लावत हा डीपफेक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. त्यानंतर चाहते त्यांना हवी तशी त्यांची लव्ह स्टोरी असायला हवी अशी अपेक्षा करत आहेत आणि सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत आहेत. चाहते हानिया आमिरला पाकिस्तानची अनुष्का शर्मा देखील म्हटले आहे. कारण विराट कोहली देखील टीम इंडियाचा कॅप्टन होता आणि बाबर आजम हा सध्या पाकिस्तानी क्रिकेट टीमचा (Pakistani Cricket Team) कॅप्टन आहे.
हानिया आमिर कोण आहे ? (Who is Hania Aamir?)
हानियाचा जन्म 1997 मध्ये पाकिस्तानच्या रावलपिंडीमध्ये झाला होता. तिला लहाणपणापासूनच अभिनयाची आवड होती. जेव्हा ती कॉलेजमध्ये होती तेव्हा तिनं रोमॅन्टिक कॉमेडी फिल्म जानमसाठी ऑडिशन दिला होता. त्यानंतर तिनं 19 वर्षांची असताना चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. दरम्यान, तिला खरी लोकप्रियता ही तितली या सीरिजमधून मिळाली आहे. यात तिनं बेवफा असलेल्या एका महिलेची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिनं ‘फिर वही मोहब्बत’ आणि ‘विसाल’ सारख्या मालिकांमध्ये काम केलं.
हे ही वाचा – Nana patekar viral Video : चाहत्याला मारहाण केलेल्या Viral Video वर Nana Patekar यांचे स्पष्टीकरण
मात्र, त्याच्या कारकिर्दीतला टर्निंग पॉइंट ‘मेरे हमसफर’ या टीव्ही शोमधून आला, ज्याने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. हा शो पाकिस्तानमध्ये टीआरपीच्या बाबतीत टॉपवर होता. पाकिस्तानसोबतच भारत, बांगलादेश आणि नेपाळमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसून आले आहे. सध्या हानिया ‘मुझे प्यार हुआ था’ या शोमध्ये दिसत आहे.