मुंबई : ईशा देओल Esha Deol आणि भरत तख्तानी Bharat Takhtani यांनी घटस्फोट Divorce घेतला आहे. लग्नाच्या अकरा वर्षानंतर हा धक्कादायक निर्णय दोघांनी घेतला. लग्नानंतर इशा बॉलीवूडमध्ये दिसली नव्हती. या दांपत्याला दोन मुली असून आतापर्यंत देओल कुटुंबाने कोणतीही प्रतिक्रिया देण्याचा टाळलं होतं.
आता ईशा देवलचे वडील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी आपल्या मुलीच्या या निर्णयाबाबत खेद व्यक्त केला आहे. खरंतर ईशा देवल आणि भरत यांच्यामधील नात्यात अनेक दिवसांपासून दुरावा आला होता.
त्यानंतरच विभक्त होण्याचा निर्णय या दोघांनी घेतला असल्याच समजत. दरम्यान आई-वडील विभक्त झाल्याने मुलांवर परिणाम होतो. मुलांसाठी का होईना एकदा पुनर्विचार करावा अशी भावनिक साद ईशाच्या वडिलांनी घातली आहे.