पुणे : यंदाचे 100 वे मराठी नाट्य संमेलन Marathi Natya Sammelan पिंपरी चिंचवडमध्ये होणार आहे. या नाट्यसंमेलनाच्या देखण्या आणि कलाकारांच्या सोयीसुविधांची नियोजनमध्य उभारणी व्हावी जिल्हा नियोजन समितीच्या वतीने 20 लाखाचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy CM Ajit Pawar यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी शासनातर्फे 10 कोटी रुपये देण्यात येणार आहे. या संमेलनासाठी आमदार निधीतून प्रस्ताव आल्यास मान्यता देण्यात येईल. नाट्य संमेलनासाठी मंडप अत्यंत उत्तम दर्जाचा असावा. नाट्य कलावंतांना आवश्यक सर्व सुविधा पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उपलब्ध करून द्याव्यात. सर्वांच्या स्मरणात राहील असे आयोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली.
या मंत्री उदय सामंत म्हणाले कि, ” संमेलनासाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही संमेलनाला सहकार्य करण्यात येईल.” यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी उपस्थित होते.