मुंबई : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन Amitabh Bachchan यांच्या तब्येतीबाबत एक मोठी अपडेट Health Update समोर येते. नुकतीच मुंबईतील कोकीलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयामध्ये बिगबिनवर एन्जिओग्राफी शस्त्रक्रिया Angiography surgery करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी स्वतःच माहिती देखील दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज शुक्रवार दिनांक 15 मार्चला सकाळी सहा वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पायामध्ये क्लॉट असल्याकारणाने त्यांच्यावर ऍन्जिओग्राफीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं समजतंय. स्वतः अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून सर्वांचे आभार मानले आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं स्पष्ट आहे.