मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायणाच्या पहिल्या भागावर आधारित आहे. ज्यात सीतेचे अपहरण होते. या चित्रपटात ‘रावणाचा वध’ पर्यंतचा प्रवास दाखवण्यात आलेला आहे. यात रामाच्या भूमिकेत प्रभास, जानकीच्या भूमिकेत क्रिती सनन, लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग, हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागे, रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान अशी कास्ट आहे. हा चित्रपटाचे ५०० कोटीचे बजेट आहे. या चित्रपटात VFX चा वापर करून विशेष इफेक्ट्स देण्याचा प्रयत्न केलांय. जाणून घेवूया चित्रपटाचे बॉक्स आॅफिस डे – १ कलेक्शन.
आदिपुरुष बॉक्स आॅफिस डे – १ कलेक्शन
हा चित्रपट त्याच्या पहिल्याच दिवशी VFX आणि संवादांसाठी चांगलाच ट्रोल झाला. काहींना असेही वाटले की, प्रभासने चित्रपटातील त्याच्या भूमिकेला न्याय दिला. पहिल्या दिवसाच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार आदिपुरुषला थिएटरमध्ये जोरदार सुरुवात झाली. चित्रपटाने पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये १०० कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. चित्रपटाने हिंदीमध्ये ३५ कोटी रुपये, तेलगूमध्ये ५८.५० कोटी रुपये, मल्याळममध्ये ०.४० कोटी रुपये, तमिळमध्ये ०.७० कोटी रुपये आणि कन्नडमध्ये ०.४ कोटी रुपये कमावले आहेत. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार एकूण कलेक्शन अंदाजे ९५ कोटी रुपये आहे. खरी आकडेवारी येणे बाकी आहे.
आदिपुरुष रिलीज होण्याआधी बैलगाडी रॅली
आदिपुरुष या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये खूप आधीपासूनच होती. काल चित्रपटाची शानदार ओपनिंग झालीये. चित्रपटगृहाच्या मालकांना विशेष सूचना देण्यात आलेल्या होत्या की त्यांनी भगवान हनुमानाला श्रद्धांजली अर्पण करून प्रत्येक स्क्रिनिंगला चित्रपटगृहात एक सीट रिकामी सोडावी. आंध्रप्रदेश येथील प्रभासच्या फॅन्सने तर आदिपुरुष रिलीज होण्याआधीच बैलगाडी रॅली काढली होती. इतकेच नाही तर तेलंगणात पहाटेच्या ४ वाजता चित्रपटाचे स्क्रिनिंग ठेवले.
आदिपुरुष चित्रपट ५ भाषांमध्ये प्रदर्शित
आज आदिपुरुष हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या ५ भाषेत रिलीज झालायं. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच १ लाखाहून अधिक तिकीटांचे ऍडव्हान्स बुकींग झाले होते. आदिपुरुष हा चित्रपट एकूण ६,२०० पडद्यावर प्रदर्शित झालायं. त्याचबरोबरच हा सिनेमा लवकरच ओटीटीवर येणारे. आदिपुरुष चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो अनेक चित्रपटात हाऊसफुल झाला. ओम राऊत म्हणाला की, हा चित्रपट खास तरुणांसाठी आहे. आजच्या तरुणांना रामायण माहित नाही. त्यांनी हा चित्रपट पाहून रामायणाचे ज्ञान घ्यावे.
चित्रपट पाहून प्रेक्षक नाराज
प्रेक्षक म्हणाले की, या चित्रपटाकडून आम्हाला फार अपेक्षा होत्या. मात्र, चित्रपट पाहिल्यावर आमच्या अपेक्षा धुळीत मिळाल्या. आदिपुरुष या चित्रपटात रामायण चुकीचे दाखवण्यात आले. रामायण ही पौराणिक कथा असून त्यात सगळ्यांचा लूक त्याला साजेसा असायला हवा होता. मात्र या चित्रपटात रावणाला फार मॉडर्न लुक दिलेला आहे. त्याची हेअर स्टाईल पाहून असं वाटत आहे, जस त्याने एखाद्या बोल्ड बारबर कडून केस कापले आहे. त्याचबरोबर लंकेतल्या प्रत्येक व्यक्तीला काळे कपडे आणि नेहमी काळे ढग दाखवण्यात आलेत. लक्ष्मणाच्या स्वभावच विशिष्ट म्हणजे त्यांना गोष्टी गोष्टीवर राग येतो. या चित्रपटाच मात्र ते दाखवण्यातच आलं नाहीये.
VFX वर खर्च करण्याची आवश्यकता होती
दुसरा प्रेक्षक म्हणाला, चित्रपटात वापरण्यात आलेली भाषा थुकरट आहे. गल्लीतल्या छपरी मुलांसारखी भाषा वापरण्यात आलीये. ‘तेरी बुवा के बगीचेम आया है क्या जो हवा खाणे चला आया’ अक्षरशः असे डायलॉग या चित्रपटात वापरलेले आहेत. चित्रपटात कास्ट केलेल्या अभिनेत्यांना अभिनय छान जमलाय. प्रभास हा उत्तम अभिनेता असला तरी चित्रपटात त्याचा लूक कोणत्याच ऍंगलने रामासारखा दिसत नाहीये. चित्रपटात VFX वर थोडा खर्च करण्याची आवश्यकता होती. चित्रपटात वापरण्यात आलेले ग्राफिक्स चांगले नाहीत. या विषयी बोलायचं तर बऱ्याच चुका आहेत. या चित्रपटाच्या चांगल्या गोष्टी सांगायच्या तर , यात स्टोरी टेलिंग आणि स्क्रीनप्ले चांगला आहे. रामायण आपल्या सगळ्यांनाच माहितीये. अजय अतुलने या चित्रपटाला संगीत दिले आहे.