पुणे : कॉलेजमध्ये सीरिअर्सनी जुनियर विद्यार्थ्यांची रॅगिंग Ragging करणे हे खरंतर नवीन नाही. पण हे रॅगिंग नेमकं कसं केलं जातंय हे अत्यंत महत्त्वाच आहे. गंमत म्हणून एखादी साधी सोपी गोष्ट टास्क म्हणून दिली तर गोष्ट वेगळी, पण जर थेट एखाद्या विद्यार्थिनीच्या मागे चाकू घेऊन पळाले तर हे नक्कीच धक्कादाय प्रकरण आहे…
हा प्रकार घडला आहे लोणावळ्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयामधला, खेदजनक म्हणजे ज्या विद्यार्थिनीची अत्यंत कडू पद्धतीने रॅगिंग करण्यात आली ती विद्यार्थिनी दिव्यांग आहे आणि तिच्यावर सातत्याने केल्या जाणाऱ्या या रॅगिंगच्या प्रकारामुळे मनस्तापातून तिला ब्रेनस्ट्रोक आला आहे असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सध्या या पीडित मुलीवर पिंपरी चिंचवडमध्ये उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं
पीडित मुलगी ही लोणावळ्यातील एका नामांकित महाविद्यालयात बीबीएच शिक्षण घेते आहे. या महाविद्यालयातील हॉस्टेलमध्ये ती राहते. गेल्या अनेक दिवसांपासून तिला मोठ्या प्रमाणावर रॅगिंगचा सामना करत करावा लागत होता. ही रॅगिंग म्हणजे साधीसुधी नव्हती, तिला बाथरूममध्ये कोंडून ठेवणे तिच्या मागे चाकू घेऊन धावणे इत्यादी प्रकारचं रॅगिंग तिच्यासोबत केलं जात होतं. धक्कादायक म्हणजे तिला आत्तापर्यंत दोन वेळा चाकू देखील लागला नातेवाईकांनी या गोष्टीची तक्रार होस्टेलच्या वार्डनकडे केली होती. त्याचबरोबर लोणावळा ग्रामीण पोलीस स्थानकात देखील तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु कुठूनही कारवाई करण्यात आली नाही.
सातत्याने होणार हे रॅगिंग सहन न झाल्याने या मुलीला ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाला आहे अशी तक्रार तिच्या नातेवाईकांनी केली. त्याचबरोबर ज्या मुलींनी रॅगिंग केलं होतं. त्यांच्यावर आता तरी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे. त्यामुळे आता पोलीस आणि महाविद्यालय काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय.