कर्नाटक : कर्नाटकातील विजयनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मधुसूदन नावाच्या अवघ्या २६ वर्षीय तरुणांन लग्न जमत नाही म्हणून टोकाचे पाऊल उचलले आहे. या तरुणांना विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कर्नाटकच्या विजयनगरमध्ये कुंडलीगी तालुक्यातील गुडेकोट या गावात हा तरुण आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. दरम्यान लग्न जमत नाही या नैराश्यातून या तरुणांना दारू पिण्यास सुरुवात केली होती. त्याच्या या व्यसनामुळे देखील त्याच्याशी कोणीही आपल्या मुलीचे लग्न लावून देण्यास तयार नव्हते. त्यामुळे व्यसनाच्या आहारी गेलेल्या मधुसूदनने नैराश्यातून विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होते आहे.