पुणे : पुण्यातील ध्रुव सोनवणे हा तरुण गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होता. पुणे पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. अशातच खंबाटकी घाटामध्ये असणाऱ्या एका नाल्यामध्ये ध्रुवचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहिती नुसार, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे राहणारा ध्रुव सध्या पुण्यातील बावधन येथे एकटा वास्तव्यास होता. दरम्यान त्याच्या आत्याने चौकशी केली असता तो घरी नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर तो रात्री उशिरा घरातून बाहेर पडल्याचे दिसून आले. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य पाहता त्याचे आई वडील देखील पुण्यात आले. आणि पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
पोलिसांनी ध्रुवचा कसून तपास सुरू केला. पाच दिवसांपासून ध्रुवाचा तपास सुरू होता. दरम्यान पुणे खंबाटकी बोगदा संपल्यानंतर ध्रुवची दुचाकी आढळून आली. दुचाकीसह तो नाल्यात पडला होता. या नाल्यामध्ये मोठी झाडे झुडपे असल्यामुळे तो दिसून येत नव्हता. रस्त्यावरील झाडे काढत असताना त्याची दुचाकी आढळून आली त्यामुळे तपासाची सूत्र फिरली. या नाल्यांमध्ये ध्रुवचा मृतदेह विचित्र अवस्थेत आढळून आल्यानंतर नेमकं काय घडलं तो इथे कसा आला याचा तपास सध्या सुरू आहे.
या घटनेने सोनवणे परिवार वारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.