पुणे : पुण्यात एक धक्कादायक Pune Crime घटना उघडकीस आली आहे. एका रोडरोमिओने विवाहित महिलेचा पाठलाग करून थेट जबरदस्ती तिच्या घरात घुसून महिलेला आणि तिच्या सासूला गॅस सिलेंडरने मारहाण केली आहे. हि घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे.
याप्रकरणी सहवीस वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. संबंधित आरोपी हा या महिलेचा सातत्याने पाठलाग करत असायचा. या महिलेने ‘ मी विवाहित असून मला दोन मुले आहेत, तू मला परत त्रास देऊ नको’ असे स्पष्ट सांगून देखील तिला त्रास देणे सुरूच ठेवले. तसेच ‘तू मला खूप आवडतेस ‘ असं तो तिला सारखं म्हणून मानसिक त्रास देखील देत होता.
याप्रकरणी महिलेने पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.