पुणे : पुणे Pune Crime हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पण अशा या पुण्यामध्ये एक विक्षिप्त घटना घडली आहे. एका भोंदू बाबाच्या पैशांचा पाऊस पाडून दाखवतो या विचित्र कल्पनेला खरं मानून फिर्यादी यांनी आपले तब्बल 18 लाख रुपये गमावले आहेत. आज काळ एवढा पुढे गेला असताना सुशिक्षितांच्या या शहरांमध्ये अशी घटना घडावी ही खूपच नवल गोष्ट आहे. याप्रकरणी चौघा जणांन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे घटना
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील हडपसर भागातील ससाणे नगर परिसरात ही घटना घडली आहे. यामध्ये फिर्यादी विनोद छोटेलाल परदेशी यांना त्यांच्याच ओळखीच्या चौघा जणांनी फसवण्याचा कट रचला होता. यामध्ये मांत्रिक ज्याचे नाव आईरा शॉब असे सांगण्यात आले आहे. हा पैशांचा पाऊस पाडून देतो या कल्पनेला एवढे भक्कमपणे पटवून देण्यात आले की फिर्यादी यांनी आपले तब्बल 18 लाख रुपये देऊ केले. हि पूजा करू तब्बल ५ कोटींचा पाऊस पडतो असे या तांत्रिकाने पटवून दिले होते.
त्यानंतर हे बाकी ३ आरोपी आणि मांत्रिक आईरा शॉब यांनी एक अघोरी पूजा मांडली. या पूजेमध्ये हे 18 लाख रुपये ठेवण्यात आले. ही पूजा सुरू असताना अचानक या ठिकाणी पोलीस दाखल झाले आणि या पोलिसांनी पूजेमध्ये ठेवलेले 18 लाख रुपये घेऊन पळ काढला. अर्थातच हे पोलीस देखील फसवे होते. आपली फसवणूक झाली आहे ही गोष्ट लक्षात येताच फिर्यादी विनोद छोटेलाल परदेशी यांनी हडपसर पोलीस स्थानकामध्ये धाव घेतली आहे.
हडपसर पोलिसांनी विनोद परदेशी यांच्या तक्रारीनुसार मांत्रिक आईरा शॉब याच्यासह माधुरी मोरे, रॉकी वैद्य आणि किशोर पंडागळे या चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या चौघा जणांचा हडपसर पोलीस आता शोध घेत आहेत.